नियम धाब्यावर बसविल्याने प्रवेश रद्द झालेल्या १७ खासगी वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत वैद्यकीय (बीडीएस) महाविद्यालयातील सुमारे २०० जागा रिक्त ठेवण्याऐवजी त्या जागी नव्याने प्रवेश करण्यात यावे, अशी सूचना प्रवेश नियंत्रण समितीने राज्य सरकारला केली आहे. नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविल्यास तो राज्यातील शेकडो विद्यार्थी-पालकांना दिलासा असेल. कारण, प्रवेश नाकारले गेलेले शेकडो विद्यार्थी अजूनही आपल्याला रिक्त जागांवर प्रवेश मिळेल या अपेक्षेवर आहेत.
समितीने प्रवेशांमध्ये पारदर्शकता यावी व विद्यार्थ्यांची संस्थास्तरावर प्रवेश करताना होणारी ससेहोलपट थांबावी यासाठी हे प्रवेश कॅपनुसार (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) करण्याची मागणी केली आहे. मात्र, समितीला यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. कारण, ३० सप्टेंबर ही वैद्यकीय प्रवेशासाठीची मुदत न्यायालयानेच आखून दिली आहे. या मुदतीनंतर प्रवेश करायचे झाल्यास त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे.
प्रवेशाचे नियम धाब्यावर बसविल्याने समितीने नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेज, नाशिकचे डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, धुळ्याचे एसीपीएम मेडिकल कॉलेज, नागपूरचे एनकेपी साळवे, अमरावतीचे पंजाबराव देशमुख कॉलेज, अहमदनगरचे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कॉलेज, पुण्याचे काशीबाई नवले कॉलेज, जळगावचे उल्हास पाटील कॉलेज, सोलापूर अश्विनी रूरल कॉलेज पुण्याचे एमआयएमईआर, साताऱ्याचे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च या वैद्यकीय तर पुण्याचे सिंहगड दंत कॉलेज, खेडचे योगिता महाविद्यालय, नवी मुंबईचे तेरणा, एमजीएम, वायएमटी आणि नाशिकचे केबीएच या दंत महाविद्यालयातील दुसऱ्या प्रवेश फेरीनंतरचे प्रवेश रद्द केले आहेत.
खासगी वैद्यकीयच्या रद्द प्रवेशांच्या जागा नव्याने भरणार?
नियम धाब्यावर बसविल्याने प्रवेश रद्द झालेल्या १७ खासगी वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत वैद्यकीय (बीडीएस) महाविद्यालयातील सुमारे २०० जागा रिक्त ठेवण्याऐवजी त्या जागी नव्याने प्रवेश करण्यात यावे, अशी सूचना प्रवेश नियंत्रण समितीने राज्य सरकारला केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-01-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private medical cancelled admission seat will be filled