२००८ सालच्या जागतिक वित्तीय अरिष्टाचे खूप आधीच भाकीत करणाऱ्या अर्थतज्ज्ञाने अर्थविश्वाला पुन्हा एकदा धोक्याचा पूर्वसंकेत देताना, विशेषत: विकसित राष्ट्रांनी एकाएकी पुन्हा एकदा व्याजदर अल्पतम राखण्याकडे दाखविलेला विद्यमान कल भयंकर धोकादायक ठरेल असे म्हटले आहे. पतविषयक निर्णय हे आकस्मिक नव्हे तर पूर्वानुमाने व पुरेशा काळजीने घेतले जायला हवेत, असे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिपादन केले.
भांडवलाच्या मूल्यात बऱ्याच काळापर्यंत सारखे बदल करीत राहिल्याने, गुंतवणुकीचे चित्रच विद्रूप बनेल. गुंतवणुकीच्या निर्णयाच्या चालढकलीने अर्थव्यवस्थेच्याच प्रारूपालाच इजा पोहोचेल, असे राजन यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले. ‘टाइम’ला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल राजन म्हणाले की, ‘‘आपण खड्डय़ात रुतून बसलो आहेत, त्यातून आकस्मिक बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला तरीही जखमी होण्याचा संभव आहे. त्याऐवजी मी (अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्ह)च्या अधिकाऱ्यांशी सहमती दर्शविताना म्हणेन की, जर आपल्याला खड्डय़ातून वर यायचेच आहे तर तसा प्रयत्न एकाएकी न करता पूर्वानुमान घेऊन आणि काळजीपूर्वक करू या.’’
‘‘आपण कृत्रिमरित्या व्याजाचे दर हे त्याच्या नैसर्गिक दरापेक्षा कमी ठेवले आहेत आणि त्यायोगे अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असलेल्या चुकीच्या गुंतवणुकांना खतपाणी घातले आहे,’’ असे त्यांनी युरोपातील निम्नतम व्याजदरामुळे निर्माण झालेल्या ‘सुपर इझी मनी’कडे संकेत करताना सांगितले.
गेली काही वर्षे मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांनी बाजारांच्या बचावकर्त्यांची भूमिका धारण केली आहे आणि दीर्घ काळासाठी व्याजदर कमी ठेवून त्या बाजारातील मालमत्तांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त फुगवटय़ाला हातभार लावला आहे. ज्यातून हे बाजार प्रतिकूल घटनेच्या हलक्याशा गंधवार्तेने कोसळतील अशा नाजूक अवस्थेला पोहोचविले गेले आहेत, अशी राजन यांनी टीका केली.
दीर्घ काळासाठी व्याजाचे दर खाली राखणे म्हणजे संकटच म्हणायचे काय, असा राजन यांना प्रश्न केला असता, ‘पतधोरणाला इतकेच करण्याची मुभा आहे आणि एका ठरावीक टप्प्यापलीकडे त्यातून काही चांगले निष्पन्न होण्याऐवजी नुकसानच घडेल.’’ जगभरच्या वित्तीय व्यवस्थांमध्ये नियमित सुसूत्रता, समन्वय आणि संवाद यापुढच्या काळातही राहणे हे केवळ उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठीच नव्हे तर खुद्द अमेरिकेच्या स्वारस्यासाठीही आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अमेरिकेनेच पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाकेले.
व्याजदराचा आकस्मिक फेरा धोकादायक : रघुराम राजन
२००८ सालच्या जागतिक वित्तीय अरिष्टाचे खूप आधीच भाकीत करणाऱ्या अर्थतज्ज्ञाने अर्थविश्वाला पुन्हा एकदा धोक्याचा पूर्वसंकेत देताना, विशेषत: विकसित राष्ट्रांनी एकाएकी पुन्हा एकदा व्याजदर अल्पतम राखण्याकडे दाखविलेला विद्यमान कल भयंकर धोकादायक ठरेल असे म्हटले आहे.
First published on: 12-09-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan channels fischer with rbi revamp plan