सणासुदीच्या या दिवसांमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ (JIO) ने ग्राहकांसाठी उत्कृष्ट व्हाउचर आणले आहेत. कंपनीने JioTogether नावाचा एक रेफरल कोड सादर केला आहे. हा कोड नवीन जिओ प्रीपेड नंबर आणि कंपनीच्या नेटवर्कवर पोर्ट केल्यानंतर वापरला जाऊ शकतो. तसेच कंपनीच्या मते, या ऑफर अंतर्गत रेफर करणारे आणि रेफर झालेल्या (दोन्ही) लोकांना ९८ आणि ३४९ रुपयांचे व्हाउचर मिळणार आहे. त्याचबरोबर कंपनी २,००० रुपयांपर्यंत विविध ब्रँडचे अतिरिक्त डिस्काउंट व्हाउचर देखील कंपांनीकडून देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वापरकर्त्याच्या पहिल्या रेफरलवर त्यांना ९८ रुपयांचे विनामूल्य रिचार्ज मिळणार आहे. या पॅकमध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि १४ दिवस अमर्यादित कॉलिंग दिले जाईल. तसेच वापरकर्त्याचे पुढे जेव्हा १२वे रेफरल होईल, तेव्हा कंपनीकडून ३४९ रुपयांचे सहा व्हाउचर दिले जातील. प्रत्येक व्हाउचरमध्ये दररोज ३ जीबी इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ही ऑफर १२ ऑक्टोबरपासून लाइव्ह झाली असून ती टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे.

व्हाउचर कसे मिळवायचे?

हे व्हाउचर मिळवण्यासाठी वापरकर्त्याला जिओच्या नवीन नंबर / सिमवर १९९ किंवा २४९ रुपयांचे पहिले रिचार्ज करावे लागेल. वापरकर्त्यांना रेफरल कोड हा शेअर करावा लागतो. नंबर अॅक्टिव्हेट होताच त्यांना इंग्रजीमध्ये FRIEND लिहून ७९७७४७९७७४ (7977479774) या नंबरवर व्हॉट्सअॅप कोड शेअर करावे लागेल. रेफर करणाऱ्याचा मोबाईल क्रमांकही तीन दिवसांच्या आत सादर करावा लागेल. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हाउचर नंबर येईल आणि वापरकर्ता माय जिओ अॅपवर जाऊन या कोडचा दावा करू शकतील.

कंपनी २०% कॅशबॅक देखील देत आहे

दरम्यान तुम्ही केलेल्या जिओच्या रिचार्ज पॅकवर २० टक्के कॅशबॅक देखील देत आहे. तुम्हाला हा कॅशबॅक कमीत कमी २०० रुपयांच्या रिचार्जवर मिळू शकतो, ज्या अंतर्गत तुम्ही २०० रुपयांपर्यंत देखील मिळवू शकता. ही कॅशबॅक ऑफर फक्त जिओ प्रीपेड मोबाईल रिचार्जवर लागू होईल.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio is giving 28 days pack for free and 20 cashback is also being offered know how you can take benefits scsm