भारतीय दूरसंचार क्षेत्रात पुनप्र्रवेश करण्याचे मुकेश अंबानी यांचे स्पप्न वर्षअखेर पूर्ण होऊ घातले आहे. बहुप्रतिक्षित असलेली रिलायन्स जिओची ४जी सेवा येत्या डिसेंबरपासून अवघ्या ४,००० रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची त्यांनी शुक्रवारी घोषणा केली.
दशकभरापूर्वी ‘मान्सून हंगामा’ या ब्रीदासह या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या मुकेश अंबानी यांनी नव्या जोमाने होत असलेल्या पुनर्प्रवेशात, आपल्या सेवेसाठी मोबाइलधारकांना महिन्याकाठी देयक ३०० ते ५०० रुपयांचे असेल, असे वचन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जमलेल्या भागधारकांना दिले.
मुंबईतील या सभेत पत्नी व नवनियुक्त संचालिका नीता अंबानी व दोन्ही पुत्रांच्या उपस्थितीत मुकेश अंबानी यांनी केलेल्या तासाभराच्या संबोधनात, त्यांचा उद्योगसमूह आघाडीवर असलेल्या तेल व वायू क्षेत्रात येत्या दीड वर्षांत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अतिवेगवान अशा ४जी दूरसंचार सेवेसाठीचे देशव्यापी परवाना मिळालेली रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही एकमेव कंपनी आहे. याबाबतच्या ध्वनिलहरी लिलावात यशस्वी ठरलेल्या कंपनीची सेवा गेल्या वर्षीच अस्तित्वात येणे अपेक्षित होते. सध्या या सेवेची अंतर्गत तपासणी सुरू असून आता ती डिसेंबर २०१५ अखेर अस्तित्वात येईल, असे स्पष्ट झाले आहे. दूरसंचार सेवेचे १०० टक्के जाळे येत्या तीन वर्षांत देशभरात पसरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी यांना रस असलेल्या एकत्रित रिलायन्स समूहाने दशकभरापूर्वी दूरसंचार सेवा क्षेत्रात शिरकाव केला होता. अवघ्या ५०० रुपयांमध्ये सीडीएमए तंत्रज्ञानावर उपलब्ध मोबाइल सेवेवर त्या वेळी ग्राहकांच्या उडय़ा पडल्या होत्या. रिलायन्सच्या विभाजनात हा व्यवसाय अखेर धाकटे अनिल अंबानी यांच्याकडे गेला, जो रिलायन्स कम्युनिकेशन्स नावाने कार्यरत आहे.
‘रिलायन्स जिओ’चा चार हजारात स्मार्टफोन
बहुप्रतिक्षित असलेली रिलायन्स जिओची ४जी सेवा येत्या डिसेंबरपासून अवघ्या ४,००० रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची त्यांनी शुक्रवारी घोषणा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-06-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio to launch 4g smartphone at rs