धनू : आर्थिक प्रश्न मिटेल

शुभदायक चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मंगळ कन्या राशीत दशमस्थानात, शुक्र तूळ राशीत लाभस्थानात ५  सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. अमावास्या भाग्यस्थानातून सिंह राशीत होत आहे. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करायला उशीर लागत होता, सध्या तो कालावधी वाट पाहायला लावणारा नाही. तत्परतेने सर्व गोष्टी जुळून येतील. श्रीगणेशाचे आगमन नेहमीपेक्षा उत्सुकतेने कराल. नोकरदार वर्गाचे कामातील धाडस वाढलेले असेल. जबाबदारीने घेतलेले काम तडीस लावाल. व्यावसायिकदृष्ट्या छोट्या-मोठ्या व्यवसायांतून अजून काही कलाकौशल्याच्या वस्तू करण्याचा छंद जोपासाल. आर्थिक प्रश्न मिटेल. राजकीय क्षेत्रात कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी सप्ताह बराच अंशी अनुकूल आहे. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : कामाच्या नियोजनामुळे त्रास नाही.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader