जसा अन्य चित्रपटांचा ‘प्रोमोज’ सुरू होतो, तसाच ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ याही चित्रपटाचा सुरू झाला. मूळ ‘नो एन्ट्री’ची ‘सही रे सही’ नक्कल करण्यात धन्यता मानल्याने त्यात वेगळे असे काय दिसणार? पण ‘दिसलं’ नि सुरुवातीला धस्स झाले. हळूहळू नजरेत काय ते ‘भरलंच’.. गोव्याच्या समुद्रकिनारी ‘रेड बिकिनी’त सई ताह्मणकर छान, मस्त व सहजी पावले टाकत टाकत नि समोर साक्षात कॅमेरा आहे हे विसरत पुढे येऊ लागली. आकर्षक व दिलखेचक अशी ही अदा दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिप हिप हुर्ये’त स्मिता गोंदकरने सहजपणे बिकिनी रूपात दर्शन घडवले. चित्रपटाचा ‘मसाला’ फारसा न जमल्याने तिचे कष्ट वाया गेले. फॅशनेबल, फिट्ट, शॉर्ट्स अशा वस्त्रांचे बऱ्याचशा ‘मराठी तारका’ना वावगं वाटत नाही, हे काही चित्रपटांतून प्रसन्नपणे दिसते. सई तर ‘बिकिनी’त चार्मिग व ब्युटिफूल दिसलीय. सिनेमात हे दृश्य ‘फिट’ दिसू देत. प्रसंगानुसार असे काही आले तरच त्यात ‘शान’ असते. चित्रपटातील अन्य तारकांपेक्षा (क्षमेची ‘क्रांती’ असो) तूच सरस असे या साऱ्यावर थेट मत व्यक्त करीत सईला म्हटले, त्यावर ती हसली. पण मी तुमच्या मताशी सहमत आहे असे तिला म्हणायचे आहे अथवा नाही हे लक्षात येण्यापूर्वीच तिची ‘ओपन बँक रूपा’तील छबी काढण्यास व तसे सेक्सी लूक मिळविण्यात फोटोग्राफर तिच्या ‘मागे’ लागले.