कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याचा हा नवा शो पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या शोची निर्मिती अभिनेता सलमान खान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याची स्वतंत्र निर्मिती संस्था आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोडक्शन हाऊसमध्ये कपिलच्या आगामी शोची निर्मिती होणार आहे. त्यामुळे आता हा शो एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये होणार असल्यामुळे चाहत्यांना या शोविषयीची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

दरम्यान, सलमानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या शोची निर्मिती होणार असल्यामुळे कपिलला भाईजानकडून हे दिवाळीचं गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे. कपिलचा हा शो येत्या १६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारती, कृष्णा हेदेखील कपिला साथ देणार आहेत. त्यामुळे ते या शोमध्ये झळकले तर प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवानी ठरणार आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to support kapil sharma may produce kapil sharma show