वृश्चिक : कर्तृत्व बहरेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. शुभदायक गोष्टींचे संकेत दिसू लागतील. अमावास्या सिंह राशीतून दशमस्थानात होत आहे. मंगळ कन्या राशीत लाभस्थानात, शुक्र तूळ राशीत व्ययस्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. दिनांक १०, ११ रोजी अनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. श्रीगणेशाचे आगमन सर्वांसोबत हसतखेळत कराल. वातावरण प्रसन्न राहील. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. व्यावसायिकदृष्ट्या सुधारित घटनांचा ओघ राहील. उत्पादन भरघोसरीत्या वाढवता येईल. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. राजकीय क्षेत्रात कर्तृत्व बहरेल. मैत्रीच्या नात्यात मात्र तडकाफडकी बोलणे टाळा. नातेवाईकांचे सहकार्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : ठरवलेली वाटचाल योग्य असेल.

स्मिता अतुल गायकवाड