भांडवली बाजारातील तेजी सप्ताहअखेरही कायम राहिली. शुक्रवारच्या सत्रात २८६.९२ अंशांची वाढ नोंदविताना सेन्सेक्सने २६,६५६.८३ पर्यंत मजल मारली. तर ८,००० पुढील क्रम राखताना निफ्टी आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात ८७ अंशींनी विस्तारत ८,१५६.६५ पर्यंत झेपावला.
मुंबई निर्देशांकाची चालू सप्ताह कामगिरीही गेल्या तीन महिन्यात अव्वल ठरली. तर शुक्रवारचा त्याचा बंद हा गेल्या सहा महिन्यातील सर्वोत्तम राहिला आहे. आशियाई आणि युरोपीय बाजारातील तेजीच्या जोरावर येथील प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारच्या मोठय़ा वाढीची परंपरा दुसऱ्या सत्रातही कायम राखली. तेजीसह सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सने सत्रात २६,६७७ पर्यंत मजल मारली. आठवडय़ात सेन्सेक्स १,३५१.७० अंशांनी तर निफ्टी ४०६.९५ अंशांनी विस्तारला आहे. प्रमुख निर्देशांकांची ही ४ मार्चनंतरची उत्तम साप्ताहिक कामगिरी राहिली.
सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड कायम
शुक्रवारच्या सत्रात २८६.९२ अंशांची वाढ नोंदविताना सेन्सेक्सने २६,६५६.८३ पर्यंत मजल मारली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-05-2016 at 05:32 IST
Web Title: Sensex gaining streak continues