गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये परिणाम घडवून आणणाऱ्या करोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे सेन्सेक्स शुक्रवारी गडगडला. गुरुवारी दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं वृत्त जगभर पसरलं. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. तब्बल १४०० अंकांनी सेन्सेक्स घसरल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालं. सेन्सेक्सच्या या उलट प्रवासामुळे गुंतवणूकदारांचं तब्बल ६ लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सेन्सेक्समध्ये झालेली २.४१ टक्क्यांची घट ही सेन्सेक्सचा आकडा थेट ५७ हजार ३७९ अंकांपर्यंत खाली घेऊन आली.
Sensex : सेन्सेक्सच्या गटांगळ्या, १४०० अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी पाण्यात!
करोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याचे परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात दिसून आले.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 26-11-2021 at 11:27 IST
Web Title: Sensex today bse down by 1400 points nifty50 also lowered pmw