रायगड जिल्ह्यातील शेकाप सेना युती संपुष्टात आली आहे. शिवसेनेशी काडीमोड करत शेकापने लोकसभा निवडणूकीत उडी मारली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून लक्ष्मण जगताप तर रायगड लोकसभा मतदारसंघातून रमेश कदम यांना शेकापने उमेदवारी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदानात झालेल्या मेळाव्यात पक्षाने दोन्ही उमेदवारांची घोषणा केली आहे.
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज दोन्ही नावाची घोषणा केली. २००४ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आम्ही निवडणूक िरगणात उतरलो असल्याचे त्यांनी जाहीर केले. मावळ मधे आमचा उमेदवार मांडीवर ठोकत निवडणूक िरगणात उतरला आहे. पण राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही. तर शिवसेनेला दुसरया पक्षातून आणावा लागतो आहे. हा आमचा विजय असल्याचा दावा आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
    आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. ज्यांना आम्ही लोकसभेत पाठवले त्यांनी आमचा विश्वासघात केला. अपमान केला. शेकापचा कार्यकर्ता मानाने जगणारा आहे. तुम्ही निवडून आलात तर आम्हाला कधीतरी फोन करत जा आणि खासदार फंडातून टक्केवारी घेऊ नका असा सल्ला देत त्यांनी अनंत गीते यांना टोमणा लगावला. आमची लढाई या दोन पक्षातील विदुषकांबरोबर आहे. सुनील तटकरे हे वेगवेगळ्या टोप्या घालायला लागले आहे. आता त्यांनी लोकांना टोप्या लावून कसे फसवले आणि कसे पसे खाल्ले याचा पंचनामा रोज करणार असल्याचे सांगत सुनील तटकरे यांना इशारा दिला. पालकमंत्री तटकरेंसारखा नसावा अशी टीका त्यांनी केली. लोकसभेची परिस्थीती बदलली आहे. एकेका खासदाराला महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रस्तापितांना घाम फुटणार आहे. खटार चिन्ह परत मिळवण्यासाठी आम्ही निवडणूक िरगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतमोजणीला या कोणाला किती मत पडली या विश्लेषण करू असे सांगत त्यांनी दोघांना आव्हान दिले.
जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद केवळ शेकापत आहे. त्यामुळे आपण शेकापकडून निवडणूक लढवित असल्याचे मावळचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले. अजित पवार व शरद पवार यांना सोडतांना मला खुप वेदना झाल्या परंतू माझ्या जनतेच्या वेदना त्यापेक्षाही मोठ्या आहेत. माझ्या मतदारांना या  दोन नेत्यांकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाही. त्यामुळे मी त्यांची साथ सोडली. मी जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता आहे. वेळ आली तर राजकारणातून सन्यास घेईन पण शेकापशी गद्दारी करणार नाही असा शब्द त्यांनी आपल्या भाषणात दिला.
शेकाप नेत्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश कदम यांनी स्पष्ट केले. सध्याचे खासदार पाच वर्षांत फिरकले नाहीत. ही चूक माझ्याकडून होणार नाही. गेली ४० वर्ष मी समाजकारण केले आहे. त्यामुळे जनतेशी जोडलेला मी नेता असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा