शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला असून शिवसैनिकांमध्ये जल्लोषाच वातावरण आहे. मावळमध्ये शिवसैनिकांनी जुना पुणे- मुंबई महामार्गावर फटाके फोडून आणि वाहनचालकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ने अटक केली होती. तेव्हपासून ते सीबीआय कोठडीत होते. तब्बल शंभर दिवसांनंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आणि खासदार संजय राऊत यांना शंभर दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. यामुळं अवघ्या महाराष्ट्रात शिवसैनिक जल्लोष करत असून हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया मावळमधील शिवसैनिकांनी दिली आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गावर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि वाहनचालकांना पेढे वाटून हा आनंदाचा क्षण त्यांनी द्विगुणित केला आहे. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, संजय राऊत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे देखील भरवले. तसेच, महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना शिवसैनिकांनी पेढे भरवले.