संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास (२००३) ते कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘मोकळा श्वास’ (२०१२) हा मराठी चित्रपटसृष्टीचा एका दशकाचा प्रवास..
या काळात, ‘श्वास’प्रमाणेच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या दोन मराठी चित्रपटांची भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवड झाली, पण ऑस्करच्या नामांकनात पोहोचू शकले नाहीत.
मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये झळकावेत यासाठी राजकीय पक्षांनी त्याच्या काचा फोडल्या. पण मराठीसाठीच्या वेळा गैरसोयीच्या असल्याने बऱ्याचदा प्रेक्षकांअभावी खेळ रद्द होऊ लागले.
मराठी चित्रपटाची संख्या भरमसाट वाढली, एकेका शुक्रवारी तीन-चार चित्रपट झळकू लागले आणि
प्रेक्षकांचाच गोंधळ उडाला.
..दशकातील वजाबाकीची ही
एक झलक.
पिक्चर अभी बाकी है दोस्त.
आणखी वाचा