बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती. त्यांच्या अशा अचानक निधनामुळे बॉलिवूडमध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची जागा अन्य कोणतीही अभिनेत्री भरुन काढू शकत नाही अशी श्रीदेवी यांची कामगिरी होती. सतत हसतमुख राहणाऱ्या ‘श्री’ बॉलिवूडप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यातही सुपरहिट होत्या. प्रत्येक लहान लहान क्षण कसे एन्जॉय करायचे हे त्यांना चांगलंच माहित होती. त्यामुळे घरातील प्रत्येकाचा वाढदिवस असो किंवा अॅनिव्हर्सरी त्या उत्साहात सेलिब्रेट करत असतं. सध्या त्यांच्याच वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे श्रीदेवींचा हा वाढदिवस त्यांचा अखेरचा वाढदिवस ठरला.

श्रीदेवी यांच्या जयंतीनिमित्त भावूक झालेल्या त्यांच्या पतीने बोनी कपूर यांनीदेखील ‘श्रीं’च्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. ‘श्री’ सतत आमच्यासोबत असते असं ते म्हणालं. त्यांच्या या वक्तव्यानंतर ‘श्रीं’च्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्या प्रचंड आनंदी दिसत असून हा वाढदिवस त्यांचा अखेरचा ठरेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं.

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये ‘श्रीं’बरोबर ऐश्वर्या राय, रेखा, राणी मुखर्जी, शबाना आझमी, मनीष मल्होत्रा दिसून येत आहेत. दरवर्षी ‘श्रीं’च्या वाढदिवसाचं ग्रॅण्ड सेलिब्रेशन होत असते. मात्र यावेळी त्यांची उणीव साऱ्यांनाच भासणार आहे.