“मुले व्हायरल इन्फेक्शनचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल , असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं व्यक्त केलं आहे. देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (मंगळवार) चौथ्या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोविडचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत.
कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना आता मुलांना लवकरच शाळेत पाठविले जाऊ शकते. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, “मुलांमध्ये अॅण्टीबॉडीजचे प्रमान जास्त आहे. तसेच प्रौढांपेक्षा मुले या संसर्गाचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना शाळेत पाठविले जाऊ शकते.”
Children can handle viral infection much better; it would be wise to consider reopening primary schools first: ICMR
— Press Trust of India (@PTI_News) July 20, 2021
सेरो सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा समावेश
आयसीएमआरने चौथ्या सेरो सर्वेची आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्वे जून – जुलै दरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता. सर्वेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोविड अॅण्टीबॉडी आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते करोना संक्रमीत झाले होते.
या सर्वेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतलं गेलं होतं. यामध्ये ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुलं, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुलं आणि १८ वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता.