भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गेल्या महिन्यातील राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)वरील क्षणभराच्या कालावधीत झालेल्या वादळी पडझडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेतानाच त्यापासून सामान्य गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाचे उपायही योजले जातील अशी ग्वाही दिली आहे. गेल्या महिन्यात ‘एनएसई’वर एम्के ग्लोबल या दलाल पेढीकडून झालेल्या चुकीच्या व्यवहाराने काही सेकंदातच निफ्टी निर्देशांकात १५.५ टक्क्य़ांनी उडालेल्या घसरगुंडीने बाजारात काही काळ थरकाप निर्माण केला होता. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत अशी दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही देताना ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी या प्रकारच्या चुकीच्या किमतीवर दिल्या गेलेल्या ऑर्डर्सवर काही प्रतिबंध लादता येईल काय, याची चाचपणी सुरू असल्याचे सांगितले. व्यवहार प्रणालीतील उणीवांचे निर्मूलन तसेच खोडसाळपणावर कारवाई या दोन् ही आघाडय़ांवर सेबीचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. प्रणालीत दुरूस्तीसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारीत उपायांची लवकरच घोषणा केली जाईल.
‘फ्लॅश क्रॅश’पासून गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी लवकरच उपाय : सेबी
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गेल्या महिन्यातील राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)वरील क्षणभराच्या कालावधीत झालेल्या वादळी पडझडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेतानाच त्यापासून सामान्य गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाचे उपायही योजले जातील अशी ग्वाही दिली आहे.

First published on: 24-11-2012 at 12:46 IST
Web Title: Steps to protect investors against stock crash soon sebi