बाजार  । तं। त्र। क।ल।

गेल्या कित्येक दिवसापासून गुंतवणूकदारांच्या मनातील उत्कंठा वाढवणारा निफ्टी १०,००० चा जादुई आकडा कधी गाठणार ?  या एकाच लक्षाचा लक्षवेध या आठवडय़ात होऊन गुंतवणूकदारांच्या मनातील आनंदी भावनांसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या वरील ओव्या चपखल बसतात.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

तेजीचा आढावा : येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने एक महिना ३३,२००/ १०,३०० च्या वर सातत्याने टिकणे गरजेचे आहे.

निर्देशांकांची कलनिर्धारण पातळी ही ३१,६००/९,८०० आहे. एखाद्या संक्षिप्त घसरणीनंतर निर्देशांक पुन्हा ३२,५००/१०,००० ते १०,१५० च्या स्तराला गवसणी घालायचा प्रयत्न करेल. यात कदाचित हलकासा नवीन उच्चांक, दुहेरी उच्चांक (डबल टॉप) अथवा उतरत्या भाजणीतला उच्चांक (लोअर टॉप) मारून निर्देशांकात घसरण सुरू झाली की, उच्चांक प्रस्थापित केल्याची खुणगाठ बांधावी व त्यानंतर ही घसरण तीव्र स्वरूपाची असून सेन्सेक्सवर  १,५०० गुणांची व निफ्टीवर ५०० गुणांची म्हणजे ३०,७००/९,४५० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो. निर्देशांकात ३०,७००/९,४५० वरून सुधारणा होऊन (पूल बॅक) निर्देशांक ३२,०००/९,८५०  ते ९,९०० पर्यंत जाईल व नंतर तीव्र स्वरूपाच्या घसरणीत निर्देशांक २८,४०० ते २९,३००/८,८०० ते ९,००० पर्यंत येऊ शकतो. येणाऱ्या दिवसात निव्वळ पशाच्या जोरावर कृत्रिमरित्या निर्देशांकाचा आलेख चढता ठेवावा. जो पुढे फार मोठय़ा विनाशास कारणीभूत ठरतो.

लक्षवेधी समभाग..

महिंद्र सीआयई ऑटो 

शुक्रवारचा भाव : २५१.७० रु.

समभागाचा बाजार भाव हा २०० (२११), १०० (२३२), ५० (२४२), २० (२४४) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आहे.  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅन्ड) २३० ते २६० आहे. रु. २६० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरच उद्दिष्ट रु. २७५ आहे. दुसरे उद्दिष्ट ३००, ३२५ व दीर्घकालीन उद्दिष्ट रु. ४०० असेल या दीर्घकालीन गुंतवणूकीला रु. २१० चा स्टॉप लॉस ठेवावा.


पुढील आठवडा कसा?

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स  ३२,३०९/८८

निफ्टी  १०,०१४/५०

गेल्या आठवडय़ातील ‘एकच लक्ष’ या लेखातील महत्त्वाचे वाक्य होते, निर्देशांकाचे वरचे लक्ष हे ३२,५००/१०,००० तर आहेच; पण या तेजीच्या पर्वाचे अंतिम लक्ष हे त्याहून अधिक म्हणजे ३३,०००/१०,१०० ते १०,३०० असेल व या गुरूवारी ३२,६७२/१०,१०० चे लक्ष गाठून शुक्रवारी दिवसांतर्गत एक संक्षिप्त घसरण पण दिली.  तेव्हा ऐतिहासिक उच्चांकाचा आनंद तर आहेच. उच्चांकानंतर निर्देशांक गडगडतो हा अनुभव देखील आहेच.

 

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आशीष अरिवद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com

Story img Loader