मुंबई : जागतिक पातळीवर प्रमुख भांडवली बाजारातील सकारात्मक कल आणि देशांतर्गत पातळीवर बँकिंग समभागांतील खरेदीने मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्सने १,२७७ अंशांची झेप घेतली. अमेरिकी अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक आकडेवारी आणि त्या परिणामी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्ह व्याजदर वाढीतील आक्रमकता काहीशी शिथिल होण्याच्या आशेने जगभरात प्रमुख भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झालेली ही आतषबाजी पाहता, सणोत्सवाचा ऑक्टोबर महिना बाजाराला चैतन्य बहाल करण्याची अपेक्षा केली जात आहे.
मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,२७६.६६ अंशांनी म्हणजेच २.२५ टक्क्यांनी वाढून ५८,०६५.४७ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने १,३११.१३ अंशांची उसळी घेत सत्रादरम्यान, ५८,०९९.९४ या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. त्या पाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८६.९५ अंशांची म्हणजेच २.२९ टक्क्यांची भर पडली आणि तो १७,२७४.३० पातळीवर बंद झाला.
अमेरिकेमध्ये निर्मिती क्षेत्राच्या अपेक्षित वाढीच्या कारणाने फेडकडून आगामी काळात दरवाढीबाबत मवाळ भूमिका घेतली जाण्याची आशा आहे.
तसेच अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर कमी झाल्याने त्या परिणामी वॉल स्ट्रीटवर चैतन्य निर्माण झाले. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीवर बँकांकडून व्यवसायाबाबतच्या सकारात्मक अंदाजामुळे दलाल स्ट्रीटवरदेखील उत्साही वातावरण होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, बजाज फिनसव्र्ह, एचडीएफसी, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे पॉवर ग्रिड, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीजच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी लावलेला समभाग विक्रीचा मारा काहीसा कमी झाला. सोमवारच्या सत्रात त्यांनी ५९०.५८ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
दसऱ्याला ६ टक्के नकारात्मक परतावा
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव निर्माण झाला असून पुरवठय़ाच्या बाजूने समस्या निर्माण झाल्याने महागाई वाढली आहे. तर महागाई नियंत्रणासाठीच जागतिक पातळीवर बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आक्रमक व्याजदर वाढ केल्यामुळे त्याचा परिणाम भारतासह इतर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजारावर झाला.
चालू वर्षांत जानेवारीपासून भांडवली बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. परिणामी गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला. म्हणजे दसऱ्याच्या दिवसापासून यंदा दसऱ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत भांडवली बाजाराने ५.५८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. १२ वर्षांनंतर भांडवली बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर वार्षिक परतावा नकारात्मक राहिला आहे. तर २०२१ सालात सर्वाधिक म्हणजे ५०.६८ टक्के परतावा दिला होता.
आज कामकाज बंद
भांडवली बाजारातील सर्व व्यवहार बुधवारी दसऱ्याच्या निमित्ताने बंद असतील. गुरुवारी नियमितपणे सर्व व्यवहार सुरू राहतील.
दसरा ते दसरा परतावा
वष परतावा (टक्क्यांमध्ये)
२०११ -२१.५३
२०१२ १८.४७
२०१३ ९.७२
२०१४ २९.४२
२०१५ २.७१
२०१६ २.९१
२०१७ ११.४०
२०१८ ११.१८
२०१९ ७.९१
२०२० ८.४०
२०२१ ५०.६८
२०२२ -५.५८