वृषभ : स्वत:ला सिद्ध कराल

अमावास्या चतुर्थस्थानात सिंह या राशीत होत आहे. शुक्र तूळ राशीत, मंगळ कन्या राशीत ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. गणेश चतुर्थीनिमित्त केलेला नवा संकल्प सिद्धीस जाईल. गणरायाचे आनंदाने आगमन कराल. एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर ती पूर्ण करणे हा ध्यास सोडणार नाही व स्वत:ला सिद्ध कराल.

इच्छित गोष्टींचा लाभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांशी जुळणारे सूर सकारात्मक असतील. व्यावसायिकदृष्ट्या आपापल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा समोर येतील. व्यापारी वर्गाला फायदेशीर व्यवहार करणे सोपे जाईल. आर्थिक सफलता  मिळेल. ओळखीचा फायदा होईल. वास्तूविषयक व्यवहार होतील. सार्वजनिक क्षेत्रात स्वत:ची छबी उमटवता येईल. घरगुती वातावरण चांगले असेल. आध्यात्मिक गोष्टींची गोडी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : योग्य मार्गदर्शन लाभेल.

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader