माझ्याकडे सॅमसंग जीटी-एस ५६१० के हा मोबाइल असून त्यावर वॉट्सअॅप, लाइन, चॅट हे अॅप्स वापरता येतील का?
सिद्धेश महाजन
उत्तर – दुदैवाने तुमच्या फोनमध्ये वॉट्सअॅप किंवा त्यासारखे अॅप वापरता येणार नाही. याचे कारण म्हणजे तुमचा फोन हा जावा या संगणकीय भाषेपासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला केवळ जावावर तयार करण्यात आलेले गेम्स आणि अॅप्लिकेशन्स वापरता येतील. सध्या बाजारात असलेले बहुतांश अॅप्स हे सी या संगणकीय भाषेतून तयार करण्यात आली असून ती केवळ आधुनिक ऑपरेटिंग पद्धतीवर वापरता येतात. पण जर तुम्हाला मोबाइल मेसेंजर वापरायचा असेल तर तुम्ही रॉक टॉल्क नावाचे जावा या संगणकीय भाषेवर आधारीत अॅप्लिकेशन वापरू शकता. हे अॅपही वॉट्सअॅप सारखे काम करते. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी http://www.mobilerated.com/rocketalk-messaging-5364.html या संकेत स्थळावर भेट द्या.
मला मायक्रोमॅक्स या कंपनीचे दहा हजार रूपयांच्या आतला चांगला फोन सांगा.
शैलेश पवार / अनंत तानगडे
उत्तर – तुम्ही मायक्रोमॅक्स ए७७ हा फोन घेऊ शकता. या फोनमध्ये तुम्हाला डय़ुएल कोर आणि १३०० एमएचझेडचा प्रोसेसर मिळतो. याचे वजन अगदी १०० ग्रॅम असून यामध्ये तुम्हाला कपॅसिटीव्ह टचस्क्रीन मिळतो. याची स्क्रीन पाच इंचांची असून ४८० गुणिले ८५४ पिक्सेलचे रिझोल्युशन यामध्ये देण्यात आले आहे. हा फोन डय़ुएल सीम आहे. सध्या हा फोन सर्वत्र खुल्या बाजारात उपलब्ध नसला तरी ऑनलाइन मार्केटमधून तो खरेदी करता येऊ शकतो. लवकरच तो खुल्या मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.
tech नॉलेज: व्हॉट्स अॅप हवे आहे
माझ्याकडे सॅमसंग जीटी-एस ५६१० के हा मोबाइल असून त्यावर वॉट्सअॅप, लाइन, चॅट हे अॅप्स वापरता येतील का?
First published on: 11-01-2014 at 04:05 IST
Web Title: Tech knowledge need whatsapp