मध्य प्रदेशमधील राजकीय उलथापाल अद्याप सुरूच आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर व २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील काँग्रसचे सरकार अडचणीत सापडले आहे. तर, भाजपाकडून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जात आहे.

मध्य प्रदेशचे सरकार अल्पमतात आहे. या वस्तुस्थितीला काँग्रेसच्या नेत्यांनी जेवढ्या लवकर समजून घेतलं, तेवढं त्यांच्यासाठी चांगलं राहील. असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेशमधील सध्याचे सरकार निश्चितपणे कोसळेल. आज सराकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ आहे. असं देखील शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला बहुमत चाचणीसाठी निर्देश देण्याची मागणी भाजपाने केली होती. या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने उद्यापर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्याचबरोबर कोर्टाने सरकारला नोटीसही पाठवली आहे.