बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. सध्या काजल तिचा आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. दरम्यान काजल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. खुद्द काजलने हा खुलासा केला आहे. त्यानंतर काजल कोणाला डेट करते? ती कोणासोबत विवाह बंधनात अडकणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उभे आहेत.

नुकताच काजलने एका चॅटशोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान तिला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर काजलने लवकरच विवाह करण्याचा विचार असल्याचे म्हटले. मात्र काजलने ती कोणाला डेट करते याचा खुलासा अद्याप केलेला नाही. त्यामुळे आता काजल कोणासोबत विवाहबंधनात अडकणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या शोमध्ये काजलला तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर काजलने ‘खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण माझ्या मते माझी काळजी घेणारा, माझ्यावर प्रचंड प्रेम करणारा आणि धार्मिक असा माझा नवरा असवा’ असे उत्तर दिले आहे. काजल पुढच्या वर्षी एका प्रसिद्ध बिझनेसमॅशी विवाह करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : काजोलसोबत फ्लर्ट करणाऱ्या मनिष पॉलला बघून अजयनं काढली बंदूक

सध्या काजल आगामी चित्रपट ‘इंडियन २’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती कमल हासनसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘इंडियन २’ हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर करत असून कमल हासन आणि काजल व्यतिरिक्त सिद्धार्थ, रकुल प्रित, विवेक ओबेरॉय, प्रिया भवानी शंकर हे कालाकार देखील झळकणार आहेत.

Story img Loader