राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे.

राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

“ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते. त्या राज्यात सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जाती-पाती, धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यात आग लावण्याचं काम जर कोश्यारी यांनी केलं असेल, तर त्यांना नुसतं घरी पाठायचं की तुरुंगात पाठवायचं हा विचार करण्याची देखील वेळ आलेली आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे.

Bhagat Singh Koshyari Controversial statement Live : “राज्यापालांनी नमक हरामी केली, हे पार्सल परत पाठवायला हवं”, वाचा प्रत्येक अपडेट

तसेच, पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही मुंबई कोश्यारींनी मराठी माणसाला आंदण दिलेली नाही. तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांनी रक्त सांडून हक्काने मिळवलेली आहे. आज मराठी माणसाचा अपमान केलेला आहे, मराठी माणसाच्या मनात आग तर त्यांनी लावलेलीच आहे. परंतु आणखी एका महत्त्वाच्या मुद्य्याकडे मला लक्ष वेधायचं आहे, की राष्ट्रपतींचे हे दूत असतात. घटनेची शपथ ही सर्वांनाच घ्यावी लागते. ती शपथ घेताना जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन, सगळ्यांचा सांभाळ करणं आणि सगळ्यांना समानतेने वागवणूक देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मग हे कर्तव्य यांनी मोडलं असेल तर, त्यांच्यावर गुन्हा कोणता दाखल करायचा? कारण, ज्याप्रमाणे त्यांनी मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेलाच आहे.”

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा – नाना पटोले

याचबरोबर, “दुसरा गुन्हा हा आहे की त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे. तो देखील या मुंबई, ठाणे आज तर आता या दोन-अडीच महिन्यात राज्यभरात महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामध्ये सर्वधर्मीय जे पिढ्यांपिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्याचं काम हे राज्यपाला पदावर बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. मग हा राज्यपालांचा अधिकार आहे का? ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते. त्या राज्यात सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जाती-पाती, धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यात आग लावण्याचं काम जर कोश्यारी यांनी केलं असेल, तर त्यांना नुसतं घरी पाठायचं की तुरुंगात पाठवायचं हा विचार करण्याची देखील वेळ आलेली आहे. कारण, आज सगळे हिंदू देखील चिडलेले आहेत.” असं देखील ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

Story img Loader