१. मध्य रेल्वेची योजना; रेल्वेसेवा मुरबाड, अलिबागपर्यंत
उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरीडोरचे काम गतीमान करण्यात येत असून कल्याण ते मुरबाड या मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी दिली. वाचा सविस्तर :
२. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातच?
नाणार येथील ग्रीन पेट्रो रिफायनरी प्रकल्पासाठीचे भूसंपादन रद्द करण्यात आले असले तरी हा प्रकल्प राज्यातच होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नवीन जागेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हा प्रकल्प सागरी किनाऱ्यावरच होऊ शकणार असल्याने तो कोकणातच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर :
३.२०२२च्या ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचे पुनरागमन
हँगझोऊ (चीन) येथे २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होईल, अशी माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेने रविवारी दिली आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर :
४.मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानने लष्कराच्या रुग्णलायातून हलवले जैशच्या तळावर
भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अझहरच्या मृत्यूवरुन कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळया बातम्या येत आहेत. एएनआयने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे. भारताने बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहरचा खात्मा झाला असे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते तर लिव्हर कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते. वाचा सविस्तर :
५.भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा
भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे, अशी टीका अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असून अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरही तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करीत आहोत असा इशारा दिला आहे. भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही, पण निदान २५ टक्के कर लागू करू असे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर :