२००२ ते २००९ या कालावधीमध्ये स्टारप्लस या वाहिनीवरील ‘कुमकुम – एक प्यारासा बंधन’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेची रचना, त्याच्यातील संवाद आणि मालिकेतील कलाकारांनी वठविलेली भूमिका यामुळे ही मालिका विशेष लोकप्रिय ठरली होती. इतकंच नाही तर मालिकेतील कुमकुम या पात्रामुळे जुही परमार ही अभिनेत्री ख-या अर्थाने नावारुपाला आली. ‘कुमकुम’मुळे स्वतंत्र ओळख मिळालेली जुही मालिकेप्रमाणेच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळेदेखील विशेष चर्चेत आली.
‘कुमकुम’ मालिका यशाचं शिखर गाठत असतानाच जुहीने छोट्या पडद्यावरील अभिनेता सचिन श्रॉफ याच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचे नातं फार काळ टिकून शकले नाही. जुही-सचिनमध्ये ल्गनानंतर ही काळातच वादविवाद होऊ लागले आणि ते स्वतंत्र राहू लागले. यावेळी जुहीने तिच्या मुलीचा सांभाळ केला. मात्र हे वाद सध्या विकोपाला गेले असून या जोडीने कायदेशीरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १० वर्षांचं त्यांचं नात आता संपुष्टात येणार आहे.
‘कुमकुम’ फेम जुही-सचिन अखेर या दिवशी विभक्त होणार!
मालिकेतील कुमकुम या पात्रामुळे जुही परमार ही अभिनेत्री ख-या अर्थाने नावारुपाला आली.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-06-2018 at 14:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress juhi parmar and sachin shroff getting divorce on this date