कंपनीतील मालकी कमी होऊनही संचालक मंडळावरून पायउतार होण्यास नकार देणाऱ्या विजय मल्ल्या यांचा यूनायटेड स्पिरिट्समधील बाहेर पडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मल्ल्या यांनी कंपनी सोडण्याचे नवी मालक कंपनी दिआज्जिओकडे मान्य केल्याचे कळते. मल्ल्या यांचा सध्या या कंपनीत अवघा ५ टक्के हिस्सा आहे. तो सर्व हिस्सा विकण्याची तयारी मल्ल्या यांनी कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविल्याचे कळते. हिस्सा विकून मिळणारा काही पैसा हा मल्ल्या यांना किंगफिशर एअरलाईन्सचे कर्ज काही प्रमाणात कमी करण्यास उपयोगी येण्याची शक्यता आहे. यूनायटेड स्पिरिट्सच्या भागधारकांच्या बैठकीत दिआज्जिओने आग्रह करूनही मल्ल्या यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरून बाजुला होण्यास नकार दिला होता.

Story img Loader