वजन कमी करण्यासाठी लोकं काहींना काही करत असतात, जेवढे वजन जास्त तेवढे जास्त कष्ट करावे लागतात. त्यासाठी अत्यंत निष्ठा आणि सातत्य आवश्यक आहे. परंतु हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळ व्यायाम आणि आहाराने वजन कमी करता येत नाही, तर काही साधी जीवनशैली देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्रास होत असेल आणि खरोखरच वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही सवयी बदलल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला तुमचे वजन कमी करणे सोपे जाईल. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी अलीकडेच असे काही पर्याय सुचवले आहेत जे वजन कमी करण्याच्या बाबतीत खरे गेम चेंजर ठरू शकतात.

डॉ दीक्षा सांगतात की, तुमच्या जीवनशैलीत अशा काही सवयी बदलून तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमचे कमी झालेले वजन पुन्हा वाढणार नाही. कायमस्वरूपी वजन कमी करण्यासाठी तुमच्या दिनचर्येत या आरोग्यदायी बदलांचा समावेश करा-

साखरेऐवजी गूळ वापरा

पांढऱ्या साखरेत फक्त कॅलरीज असतात तर गुळात भरपूर पोषक असतात.

थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिणे

गरम पाण्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते. यासोबतच चयापचय क्रियाही सुधारते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

दररोज ५,००० ते १०,००० पावले चालणे

दिवसभर सक्रिय राहणे (५,०००-१०,००० पावले चालणे) तुमचे शरीर सक्रिय, लवचिक आणि शरीरातील रक्त परिसंचरण सुरळीत ठेवते.

फळांचा रस पिण्याऐवजी फळे खा

जेव्हा तुम्ही फळांचा रस घेता तेव्हा तुमचे फायबर कमी होते. जेव्हा तुम्ही फळ चावता तेव्हा फळांचे पचन तुमच्या तोंडात बरोबर सुरू होते आणि फायबर कायम राहते, त्यामुळे फळांच्या रसाऐवजी फळांचे सेवन करावे.

रात्रीचे लवकर व हलके जेवण करा

रात्रीचे पूर्ण आणि उशिरा जेवण करण्याऐवजी, हलके आणि लवकर अन्न खात जावे. कारण रात्री आपली चयापचय कमी होते. त्यामुळे रात्रीचे जेवण हलके आणि लवकर असावे.

Story img Loader