* माझे वय ५० वर्षे आहे. घरात आम्ही सहा जण आहोत. वार्षकि उत्पन्न पाच लाख रुपये आहे. नवीन कार घ्यायची आहे, जी कमी इंधनात चांगले मायलेज देऊ शकेल.
    -संतोष गांगल
* तुमचे वय आणि वार्षकि उत्पन्न पाहता तुम्हाला कोणतीही नवीन कार घेणे शक्य आहे. मात्र, तुमच्या घरातील सदस्यांची संख्या पाहता तुम्हाला एसयूव्ही घेणे केव्हाही चांगले. सद्य:स्थितीत एसयूव्हीमध्ये टोयोटा इनोव्हा तर आहेच, शिवाय शेवरोलेटची एन्जॉय ही एमयूव्ही, मारुतीची अर्टगिा हेही पर्याय आहेत. तुम्हाला निव्वळ फिरण्यासाठीच गाडी आवश्यक असेल तर इनोव्हा चांगली. डिझेलवर चालणारी इनोव्हा केव्हाही उपयुक्तच.
* मी केंद्र सरकारमध्ये व्यवस्थापक या पदावर आहे. माझे वार्षकि उत्पन्न पाच लाखांच्या आसपास आहे. आठवडय़ातून दोनदा फिरायला जाण्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल. माझे बजेट साडेतीन लाखांपर्यंत आहे.
    – किशोर वाणी
* तुम्ही म्हणता तुमचे बजेट साडेतीन लाख रुपये आहे. शिवाय तुम्हाला आठवडय़ातून दोनदाच गाडीचा वापर करायचा आहे. अशा वेळी मारुतीचा पर्याय सर्वोत्तम. मारुतीची स्विफ्ट, वॅगन आर या गाडय़ा फॅमिली कार म्हणूनच ओळखल्या जातात. शिवाय तुमचा तो आवडता ब्रँडही आहे. त्यामुळे वॅगन आरला पसंती द्यायला हरकत नाही. शिवाय मारुतीची सेलेरिओ आहे, नाहीच तर अल्टोही चांगला पर्याय होऊ शकतो.
* मला डिझेलवर चालणाऱ्या नॅनो कारविषयी सांगा.
    -विनोद चव्हाण
* टाटांची नॅनो आता विविध रंगरूपात उपलब्ध आहे. शिवाय त्यात आता अपग्रेड मॉडेल्सही उपलब्ध आहेत. मात्र डिझेलवरील नॅनो बाजारात आली किंवा कसे, याबाबत माहिती नाही. त्यामुळे तुम्ही डीलरकडे जाऊनच चौकशी करावी हे उत्तम.
* माझ्याकडे वॅगन आर गाडी आहे. तीन वष्रे वापरून झाली आहे. सध्या मी डिझेल कारच्या शोधात आहे आणि माझे बजेट आठ ते दहा लाख रुपये आहे.
    -अनिकेत भावसार
* तुमचे बजेट चांगले आहे. एवढय़ा रकमेत तुम्हाला आरामदायी सेडान अगदी आरामात मिळू शकते. फियाटची लिनिया जेट हा उत्तम पर्याय आहे. आरामशीर सेडान तर आहेच, शिवाय तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे आणि शिवाय तुम्हाला डिझेलमध्येही उपलब्ध होऊ शकते. फियाट नको असेल तर होंडाची अमेझ आहे, सिटी आहे. या गाडय़ाही तुम्हाला डिझेल व्हर्जनमध्ये उपलब्ध होऊ शकतात. शिवाय त्यांचे मायलेजही चांगले आहे.
* चार ते साडेसहा लाख यादरम्यान किंमत असलेली कोणती कार घेऊ. पुणे विद्यापीठात मी प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. माझा दररोजचा प्रवास २० किमी आहे.
    -श्रीधर पाटेकर
* तुमच्या बजेटमध्ये एन्ट्री लेव्हल कार येऊ शकते. तुम्हीला मारुती सुझुकी किंवा ह्य़ुंदाई यांपकी एका गाडीची निवड करायची आहे. या दोन्ही ब्रँडच्या गाडय़ा आज मार्केटमध्ये चांगले नाव कमावून आहेत. ह्य़ुंदाईची आयट्वेंटी चांगली परवडू शकेल. मारुतीची नवीन सेलेरिओही चांगला पर्याय आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

Story img Loader