ट्वेन्टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबईत असलेल्या टीम इंडियाला मंगळवारी एक खास पाहुणी भेटायला आली होती. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवा तिच्या बाबांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी विराट कोहलीने झिवासोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या सेल्फीत झिवा कोहलीसोबत सेल्फी काढण्याऐवजी मोबाईलशी खेळण्यात गुंग असल्याचे दिसत आहे. विराटने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर झिवासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या या सेल्फीला तब्बल एक लाखांहून अधिक लाईक्स आणि सुमारे ४००० कमेंट मिळाल्या आहेत. अशीच परिस्थिती फेसबुकवरही आहे. दरम्यान धोनीचा चांगला मित्र असणारा ड्वेन ब्राव्हो आणि हरभजन सिंग यांनीदेखील झिवासोबत छायाचित्र काढले.

With Baby DhoniShe is too cute and adorable!

Posted by Virat Kohli on Tuesday, March 29, 2016

Story img Loader