‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रुम्स सहभागी झाले आहेत. महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. २१ दिवसांच्या या महोत्सवात खरेदी करणाऱ्यांना दररोज वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणेतर्फे पैठणी साडी, पॅपिलॉन-ठाणेकडून मोबाईल संच, तसेच कलानिधी-ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), तसेच ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्ड (ठाणे-डोंबिवली)यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहेत.

पाहा फोटो अल्बम : ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’

त्याचप्रमाणे तीन आठवडय़ांच्या या महोत्सवात दर आठवडय़ाला टी.व्ही., फ्रिज आणि ‘द ब्लू रूफ’ क्लबचे एक वर्षांचे सभासदत्त्व अशी पारितोषिके दिली जातील. शिवाय महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे दोन भाग्यवान ग्राहकांना कार व वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूरची सहल अशी बंपर पारितोषिके दिली जाणार आहेत. ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल.

Story img Loader