‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रुम्स सहभागी झाले आहेत. महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. २१ दिवसांच्या या महोत्सवात खरेदी करणाऱ्यांना दररोज वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणेतर्फे पैठणी साडी, पॅपिलॉन-ठाणेकडून मोबाईल संच, तसेच कलानिधी-ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), तसेच ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्ड (ठाणे-डोंबिवली)यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे तीन आठवडय़ांच्या या महोत्सवात दर आठवडय़ाला टी.व्ही., फ्रिज आणि ‘द ब्लू रूफ’ क्लबचे एक वर्षांचे सभासदत्त्व अशी पारितोषिके दिली जातील. शिवाय महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे दोन भाग्यवान ग्राहकांना कार व वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूरची सहल अशी बंपर पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रजासत्ताकदिनपूर्वीच्या वीकएन्डनिमित्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महोत्सवाने मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.  
वीकएन्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून संघवी बिल्डर्स उप प्रयोजक आहेत. त्याचप्रमाणे वामन हरी पेठे सन्स, पीतांबरी प्रॉडक्टस् आणि तन्वी हर्बल्स हे प्लॅटिनम प्रायोजक आहेत. पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य वीणा वर्ल्ड ट्रॅव्हलर्स पार्टनर आहे. त्याचप्रमाणे टीप-टॉप प्लाझा, गुडवीन ज्वेलर्स, चाम्र्स ग्रुप, हस्तकला सहयोगी पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे जे.के., पॅपिलॉन डिजीटल, कलानिधी, वर्ल्ड ऑफ टायटन, रेमंड आणि ऑरबीट यांनी पारितोषिके प्रायोजित केली आहेत. ज्युपीटर हॉस्पिटल हेल्थ पार्टनर तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘द ब्लू रूफ क्लब’ आहे.       
 ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलीत करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’ च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी-९८२१४७५९१९ आणि निलीमा कुलकर्णी- ९७६९४००६८४ यांच्याशी संपर्क साधावा.    
भाग्यवान विजेते
ए.वाय. साळवी- ठाणे (सोन्याची राजमुद्रा), मयुरा जाधव, ठाणे (पैठणीे) मंगेश कडव, ठाणे (मोबाइल संच), अमर करटे, कल्याण (गिफ्ट व्हाऊचर्स) जे.वी. गोखले, ठाणे (गिफ्ट व्हाऊचर्स) अनंता आर. पंडित, शहापूर (गिफ्ट व्हाऊचर्स)  नितीन पंडित, कल्याण (गिफ्ट व्हाऊचर्स), अनिल येरूलकर बदलापूर (गिफ्ट व्हाऊचर्स)
स्पृहा जोशी भाग्यवंतांना पारितोषिके देणार
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील पहिल्या दिवसाच्या विजेत्यांना रविवार २६ जानेवारी रोजी ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते संध्याकाळी साडेचार वाजता ‘वामन हरी पेठे सन्स’, बी-केबीन रोड, ठाणे येथील दालनात पारितोषिके दिली जाणार आहेत.

Story img Loader