वासंती वर्तक भाग्यवान कार विजेत्या  ’ संतोष भुंडारे यांना सिंगापूरची सहल
विजेत्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षिसे जिंकल्यानंतर केला जाणारा जल्लोष ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘द ब्लू रुफ’ क्लबच्या हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी रंगला होता. निमित्त होते ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या सांगता सोहळ्याचे. कार, वीणा वर्ल्डकडून सिंगापूरची सहल, टी.व्ही., फ्रीज अशी एकाहून एक सरस पारितोषिके स्वीकारताना विजेत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. ठाण्याच्या वासंती वर्तक ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना पारितोषिक म्हणूर कार मिळाली. तर वीणाज् वर्ल्डच्या सिंगापूर सहलीचे पारितोषिक संतोष भुंडारे यांना मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरसारखी मोठी शहरे, त्यातील ८० हून अधिक गृहोपयोगी वस्तूंच्या शो रूम्सनी घेतलेला सहभाग, २१ दिवसांमध्ये ३० हजारांहून अधिक ग्राहकांनी केलेली खरेदी, अशा भरघोस प्रतिसादामुळे ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल सर्वाच्याच आकर्षणाचा विषय ठरला होता. या महोत्सवाचा अखेरचा बक्षीस वितरणाचा सोहळा सोमवारी ‘द ब्लू रूफ’ क्लबच्या हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमास इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे सीईओ जॉर्ज वर्गीस, व्हीपी थॉमस झकारिया, तरुणकुमार तिवाडी उपस्थित होते. तर या महोत्सवातील प्रायोजकत्व देणारे उद्योजक, व्यापारी, दुकानांचे मालक उपस्थित होते. त्यामध्ये सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी, संघवी ग्रुपचे राकेश संघवी, पितांबरीचे दीपक परांजपे, वामन हरी पेठे सन्सचे पुरुषोत्तम गुप्ते, तन्वी हर्बलचे पुष्कराज धामणकर, वीणा वल्र्डच्या सुनिला पाटील, टिप-टॉप प्लाझाचे रोहित शहा, द ब्लू रूफ क्लबचे विल्सन गोम्स आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्या वासंती वर्तक यांना संघवी ग्रुपचे राकेश संघवी आणि इंडियन एक्स्प्रेसचे सीईओ जॉर्ज वर्गीस यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. तर संतोष भुंडारे यांना वीणा वल्र्डच्या सुनिला पाटील यांच्या हस्ते सिंगापूर सहलीचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शेवटच्या दिवसांच्या आणि आठवडय़ाच्या विजेत्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला.
ठाण्यातील उत्साही वातावरण वाढते आहे..
सत्य बातम्या देणे हे ‘लोकसत्ता’चे वैशिष्टय़ असून ‘लोकसत्ता’मध्ये एखादी बातमी प्रसिद्ध झाली म्हणजे ती खरीच असणार हा वाचकांचा विश्वास आहे. मात्र अशा पद्धतीच्या फेस्टिव्हलचे आयोजन मात्र प्रथमच ‘लोकसत्ता’ने ठाण्यात केले. असे शॉपिंग फेस्टिव्हलसारखे उपक्रम वाढावेत अशी अपेक्षा आहे. मुंबई बरोबरीनेच झपाटय़ाने वाढणाऱ्या ठाण्यामध्ये उत्साही आणि कलात्मक वातावरण वाढत असून ठाणे आता फेस्टिव्हलचे शहर म्हणूनदेखील भरभराटीला आले आहे. ‘लोकसत्ता’ने ठाणेवासीयांसाठी सुरू केलेला हा उपक्रम उत्साही वातावरणात भर घालणारा आहे, असे ‘टिप-टॉप प्लाझा’चे रोहित शहा म्हणाले.  शॉपिंग फेस्टिव्हलचे विजेते..
सुरेश शिंदे (ठाणे) – फ्रीज, मुकेश मेहता (डोंबिवली) – एलईडी टीव्ही, माधुरी पाटील (ठाणे) – फ्रीज, शिल्पा शृंगारपुरे (ठाणे) – एलईडी टीव्ही, काव्या पाटील (ठाणे) – सुवर्ण राजमुद्रा, चंद्रशेखर क्षीरसागर (ठाणे) – पैठणी, प्रांजली कानिटकर (ठाणे) – सुवर्ण राजमुद्रा, छाया पेलणेकर (ठाणे) – पैठणी, माधवी परचुरे (डोंबिवली) – सुवर्ण राजमुद्रा, अजित देशपांडे (डोंबिवली) – पैठणी.
विजेत्यांच्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील ‘द ब्लू रूफ’ क्लब येथे ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलची सांगता झाली. यावेळी ठाण्यातील रहिवासी वासंती वर्तक या शॉपिंग फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या, तर वीणा वर्ल्डच्या सिंगापूर सहलीचे पारितोषिक संतोष भुंडारे यांना मिळाले. या कार्यक्रमास ठाण्यातील मोठे उद्योजक, व्यापारी, मोठय़ा दुकानांचे मालक तसेच प्रथितयश अशा जाहिरात एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते. इंडियन एक्स्प्रेसचे सीईओ जॉर्ज वर्गीस तसेच संघवी ग्रुपचे राकेश संघवी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्यांना कारच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

मूल्यांशी तडजोड नाही..
सध्या वर्तमानपत्रे ‘मनी मेकिंग मशीन’ बनू लागली असली, तरी ‘लोकसत्ता’ हे मूल्यांशी तडजोड न करणारे वर्तमानपत्र आहे. सक्षम आणि स्वतंत्रपणे सामाजिक जबाबदारीचे पालन करणारे हे वर्तमानपत्र आहे. मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता प्रगती साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
जॉर्ज वर्गीस,
सीईओ, द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप

वैचारिक पोषण करणारा ‘लोकसत्ता’
माध्यमे चारही बाजूंनी वाढत असून केवळ माहिती नव्हे तर वैचारिक पोषणदेखील माध्यमांनी करायचे असते. ‘लोकसत्ता’ हे वैचारिक पोषण करत असून आपल्याला ‘लोकसत्ता’ची ही आवडणारी गोष्ट आपण आपल्या कुपनमध्ये लिहिली होती. अनपेक्षितपणे हे बक्षीस मिळण्याचे भाग्य आपणास लाभले असून ‘लोकसत्ता’कडून ते स्वीकारताना आनंद द्विगुणित झाला आहे. यानिमित्ताने नशीब अजमावता आले आणि त्यातून पारितोषिकदेखील जिंकता आले याचा आनंद झाला. यानिमित्ताने ‘लोकसत्ता’सोबतचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले.
    वासंती वर्तक (ठाणे), कार विजेत्या.        

‘लोकसत्ता’ने दिलेली आनंदाची भेट
ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने नशीब अजमावता आले याचा आनंद होत असला, तरी जे वर्तमानपत्र गेल्या २५ वर्षांपासून वाचतो आहे त्या वर्तमानपत्राकडून मिळालेली ही भेट हा आनंदाचा ठेवा आहे. आपण पोलीस कर्मचारी असून, सत्य असेल ते लोकांसमोर आणण्याच्या ‘लोकसत्ता’च्या भूमिकेचे आपणास कायमच आकर्षण राहिले आहे. ‘लोकसत्ता’ने दिलेला हा सन्मान खूप मानाचा आहे.
    संतोष भुंडारे (कळवा),
वीणा वर्ल्डच्या सिंगापूर सहलीचे विजेते

शॉपिंग फेस्टिव्हलचे पारितोषिक प्रायोजक..
वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी- ठाणेतर्फे  पैठणी साडी, पॅपिलॉन- ठाणेकडून मोबाइल संच, कलानिधी- ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि वीणा वल्र्डकडून गिफ्ट हॅम्पर, त्याचप्रमाणे एका भाग्यवान ग्राहकास संघवी समूहाकडून कार आणि पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूर सहल पारितोषिक म्हणून देण्यात आली.

Story img Loader