=    आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) : अतिशय वेगाने विस्तारत  असलेल्या या क्षेत्रात गेस्ट एक्झिक्युटिव्ह किंवा रिझर्वेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. हॉटेल अथवा विश्रांतिगृहात येणाऱ्या ग्राहकांकडून योग्य ते शुल्क आकारणे, त्यांच्याशी उत्तम संवाद साधणे, त्यांना हव्या असलेल्या सेवा-सुविधा तातडीने पुरवणे यासारखी कामे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना करावी लागतात. हॉटेल व्यवस्थापन विषयात  पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. प्रारंभीचं वार्षकि वेतन दोन लाख रुपये ते अडीच लाख रुपये मिळू शकतं.
=    खान-पान सेवा कर्मचारी (फूड अॅण्ड बिवरेजेस एक्झिक्युटिव्ह) : या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना रेस्टॉरंट/ बँक्वेट हॉल/ पार्टी इत्यादीमधील खान-पान सेवेच्या संनियंत्रणाकडे लक्ष पुरवावं लागतं. ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारणे, सेवा क्षेत्रातील आरोग्यदायी वातावरण आणि स्वच्छतेकडे लक्ष पुरवणे यासारखी कामे करावी लागतात. हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पदवी/पदविकाधारकाला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय वार्षकि वेतनवाढ आणि इतर भत्ते, सोयी-सवलती वेळोवेळी दिल्या जातात. प्रारंभीचे वार्षकि वेतन दोन लाख रुपये ते अडीच लाख रुपये असू शकतं. याशिवाय वार्षकि वेतन वाढ आणि इतर भत्ते, सोयी-सवलती वेळोवेळी दिल्या जातात.
=    फॅशन डिझायिनग : या क्षेत्रात होणारी उलाढाल दर वर्षी वाढत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात र्मकडायझर म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या व्यक्तीला निर्मिती घटकांचं नियंत्रण करावं लागतं. ग्राहकांच्या गरजेनुसार फॅब्रिक सॅम्पल्स पुरवावे लागतात. गुणवत्ता नियंत्रणाकडे लक्ष पुरवावं लागतं. कोणत्याही क्षेत्रातील पदवी आणि फॅशन डिझायिनगमधील पदवी अथवा पदविका असल्यास संधी मिळणं सुलभ जातं. प्रारंभीचं वार्षकि वेतन अडीच लाख रुपये ते तीन लाख रुपये असूू शकतं. शिवाय वेतनवाढ, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ते मिळू शकतात.
फॅशन डिझायनरना  फॅशन डिझायिनगमध्ये नवनिर्मिती करावी लागते. नव्या पॅटर्नसाठी साहित्याची निवड करणे, डिझाइन टीमसोबत सातत्यानं समन्वय साधणे असं त्यांच्या कामाचं स्वरूप असतं. फॅशन डिझायिनगची पदवी घेतलेल्या उमेदवारांना या क्षेत्रात करिअर करता येतं. या क्षेत्रात प्रारंभीचं वार्षकि वेतन अडीच लाख रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत असू शकतं.  वार्षकि वेतनात १० ते १२ टक्के वाढ होऊ शकते.
=    औषधनिर्माण : या क्षेत्रात विक्री प्रतिनिधी म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते. या व्यक्तीवर कंपनीमार्फत उत्पादन डॉक्टरांकडे वितरित करण्याची जबाबदारी असते. त्यांना विक्रीचं निश्चित केलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं लागतं. या व्यक्तींना सुरुवातीला वार्षकि वेतन दोन लाख रुपये ते अडीच लाख रुपये मिळू शकतं. विक्रीच्या उद्दिष्टपूर्तीवर आधारित प्रोत्साहन भत्ते मिळू शकतात. वार्षकि १० ते १२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळू शकते. बी.फार्म वा एम.फार्म   अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना अशा प्रकारचे करिअर करण्याची संधी मिळू शकते.
=    व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) : या उमेदवारांना बाजारपेठ संशोधन संस्थेसोबत काम करावं लागतं. स्पर्धकांच्या शक्तिस्थानांचं विश्लेषण करावं लागतं. बाजारपेठेवर सातत्यानं लक्ष ठेवून त्यातील प्रवाह जाणून घ्यावे लागतात. बी.फार्म. आणि एमबीए मार्केटिंग असल्यास उत्तम. प्रारंभीचं वार्षकि वेतन चार लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. त्याशिवाय इतर भत्ते आणि प्रोत्साहन भत्ते आणि वार्षकि वेतनवाढ १२ टक्क्यांपर्यंत मिळू शकते.
=    उत्पादन क्षेत्र : अभियांत्रिकी पदवीधरांना या क्षेत्रात प्रशिक्षणार्थी म्हणून करिअरची सुरुवात करता येते. त्यांना फॅक्टरीच्या उत्पादन कामात सहभागी होऊन निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करावं लागतं. उत्पादनाच्या गुणवत्तेकडे तसेच दर्जाकडे लक्ष द्यावं लागतं. यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभालीकडे लक्ष द्यावं लागतं. या क्षेत्रात साडेतीन ते चार लाख रुपये वार्षकि वेतन मिळू शकतं. शिवाय वार्षकि वेतनवाढही मिळते. कंपनीनिहाय वेगवेगळे भत्ते मिळतात.
=    व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी : या व्यक्तींना ब्रँड व्यवस्थापन किंवा विक्री वाढवण्याच्या उपाययोजनांकडे लक्ष पुरवावं लागतात. प्रारंभीचं वार्षकि वेतन साडेचार लाख ते साडेआठ लाख रुपयांपर्यंत मिळते. कंपनीच्या नियमानुसार वार्षकि वेतनवाढही मिळते. बीई/बीटेक व एमबीए मार्केटिंग अर्हता प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना यात संधी मिळू शकते.
=    औद्योगिक उत्पादनांचे विक्री प्रतिनिधी : या उमेदवारांना विक्रीचं उद्दिष्ट साध्य करावं लागतं. ग्राहकांपुढे वस्तूंचं प्रदर्शन करावं लागतं, त्याची माहिती द्यावी लागते. उत्पादनांच्या वितरणाच्या आणि प्रसिद्धीच्या साहित्याची निर्मिती करावी लागते. बीई /बीटेक पदवीधरांना ही संधी मिळू शकते. या क्षेत्रात वार्षकि वेतन साडेतीन लाख ते चार लाख रुपये आणि वार्षकि वेतनवाढ १० टक्के मिळू शकते.
=    माहिती तंत्रज्ञान अभियंता (सिस्टिम इंजिनीअर) : या उमेदवारांच्या कामाचे स्वरूप सॉफ्टवेअरचा विकास आणि निर्मिती असे असते. त्यांना सॉफ्टवेअरची चाचणी करावी लागते.  बीई (माहिती तंत्रज्ञान)  अर्हता प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात संधी मिळू शकते. वार्षकि वेतन साडेतीन ते चार लाखांपर्यंत मिळू शकतं. वार्षकि वेतनवाढ साधारणपणे
१० टक्के असते.
=    रिटेल : या क्षेत्रात एक्झिक्युटिव्ह म्हणून संधी मिळू शकते. त्यांना ग्राहकांच्या विविध समस्यांचं समाधान करावं लागतं. विक्री अधिकाधिक व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही विषयातील पदवीधराला संधी मिळू शकते. करिअरच्या प्रारंभी वार्षकि वेतन दोन ते तीन लाख
मिळू शकते.
=    मॅनजमेंट ट्रेनी : व्यवसायाचे व प्रकल्पाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीची असते. त्यांना व्यवस्थापकीय माहिती कार्यप्रणाली अहवाल तयार करावे लागतात. ग्राहक आणि तांत्रिक पथकांमध्ये समन्वय साधावा लागतो. ग्राहकांना योग्य ती सेवा पुरवावी लागते. एमबीए (मार्केटिंग) अर्हताप्राप्त उमेदवारांना यांत संधी मिळू शकते. या क्षेत्रात वार्षकि साडेचार लाख रुपये ते साडेपाच लाख रुपये इतके वेतन मिळू शकतं. कंपनीच्या नियमानुसार
१० टक्के वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळू शकतात.
=    टेलीकॉम क्षेत्र : या क्षेत्रात कार्यरत प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना प्रकल्पांवर काम करावं लागतं, ग्राहकांशी समन्वय साधावा लागतो. अर्हता- बीई. वार्षकि वेतन चार लाख ते साडेचार लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं तसेच इतर प्रोत्साहनात्मक भत्ते मिळतात.
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

Story img Loader