विविध विद्याशाखेचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या देशभरातील दर्जेदार शिक्षणसंस्थांची माहिती आणि संस्थांच्या प्रवेशप्रक्रियेची ओळख-
दहावी आणि बारावीनंतर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अनेक शासकीय संस्था आहेत. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना या संस्थांचा विद्यार्थी आणि पालकांनी प्राधान्याने विचार करायला हवा. या शिक्षणसंस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना केंद्राचे आणि राज्य सरकारचे आíथक सहकार्य लाभले आहे. यातील बहुतेक संस्थांना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा प्राप्त झालेला आहे. या संस्थांमध्ये नियमाप्रमाणे उत्तम प्रयोगशाळा, वाचनालये व अनुभवी प्राध्यापकवर्ग असतो. विविध शैक्षणिक सुविधा या संस्थांमध्ये उपलब्ध असतात. या संस्थांमधील ‘प्लेसमेंट सेल’द्वारे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा काही संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे आहे-
’ वैद्यकीय शिक्षण- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स- नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू इन्स्टिटय़ूूट ऑफ मेडिकल सायन्स- पुड्डिचेरी, सेवाग्राम मेडिकल कॉलेज, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये.
’ अभियांत्रिकी शिक्षण- आयआयटीच्या सर्व संस्था, नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सर्व संस्था, राज्यातील सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासनाची तंत्रनिकेतने.
’ डिझायिनग- नॅशनल स्कूल ऑफ डिझायिनग, पाल्डी अहमदाबाद.
’ फॅशन तंत्रज्ञान- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- नवी दिल्ली/ नवी मुंबई.
’ पत्रकारिता/ मास कम्युनिकेशन- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन- नवी दिल्ली/ झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, मुंबई.
’ योग शिक्षण- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग- नवी दिल्ली.
’ विधी शिक्षण- नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी/ विद्यापीठातील विधी महाविद्यालये, नॅशनल लॉ स्कूल्स.
’ हॉटेल मॅनेजमेन्ट- नॅशनल हॉटेल अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेन्ट कौन्सिलच्या अंतर्गत येणारी सरकारी महाविद्यालये, डॉ. वाय.एस.आर. नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट- हैदराबाद.
’ लष्करी शिक्षण- नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी- खडकवासला, इंडियन मिलिटरी स्कूल- चेन्नई.
’ वैमानिक प्रशिक्षण- इंदिरा गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन- रायबरेली
’ कथ्थक नृत्य- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक- नवी दिल्ली.
’ खेळ प्रशिक्षण- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस्-पतियाळा, राणी लक्ष्मीबाई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन – ग्वाल्हेर.
’ चित्रपट/ टीव्ही प्रशिक्षण- फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे/ सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, कोलकाता.
’ स्टॅटिस्टिक्स- इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट कोलकाता.
’ मॅथेमॅटिक्स- चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट- चेन्नई.
’ ग्रामीण व्यवस्थापन- रुरल इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट- आणंद.
’ अध्यापन- रिजनल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट-
भोपाळ/ म्हैसूर.
’ पादत्राणे निर्मिती-सेंट्रल फुटवेअर ट्रेिनग
इन्स्टिटय़ूट- चेन्नई.
’ मरीन अभियांत्रिकी- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी, नवी मुंबई.
’ संशोधन- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळुरू, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुणे/ भोपाळ/ भुवनेश्वर, डिपार्टमेन्ट ऑफ अॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस – मुंबई.
’ पर्यटन- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम मॅनेजमेन्ट- ग्वाल्हेर.
’ माहिती तंत्रज्ञान- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी- ग्वाल्हेर.
’ इंटिग्रेटेड अभ्यासक्रम- वेगवेगळी केंद्रीय विद्यापीठे.
’ व्यवस्थापन- सर्व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट.
’ सामाजिक शास्त्रे- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स.
’ पेट्रोलिअम टेक्नॉलॉजी- राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी- रायबरेली.
’ फॉरेस्ट्री- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट
मॅनेजमेन्ट- भोपाळ.
’ वित्त- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स- नवी दिल्ली/ नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेन्ट- नवी दिल्ली.
’ हेल्थ अॅण्ड हॉस्पिटल मॅनेजमेन्ट- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेन्ट – बेंगळुरू.
’ अपंग शिक्षण/प्रशिक्षण- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड- मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअिरग- म्हैसूर.
’ फिशरी सायन्स- सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अॅण्ड इंजिनीयिरग- कोची.
’ जेम्स अॅण्ड ज्वेलरी – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी- मुंबई.
प्रवेश प्रक्रिया
साधारणत: विविध विद्याशाखांच्या दर्जेदार संस्थांची यादी वर दिली आहे. यातील बहुतांश संस्थांमध्ये अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या संस्थांमधील शैक्षणिक अभ्यासक्रम हे जून-जुल या महिन्यांत सुरू होतात. मात्र, प्रवेशासाठीची प्रवेशप्रक्रिया किमान तीन-चार महिने वा त्याआधीच सुरू होते. या महत्त्वाच्या बाबीकडे बहुतेक विद्यार्थ्यांचे वा पालकांचे दुर्लक्ष होते. बारावीची परीक्षा झाल्यावर अथवा बारावीचा निकाल लागल्यावर अनेक पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची माहिती घ्यायला सुरुवात करतात. या शोधमोहिमेतून त्यांच्या लक्षात येते की, काहींच्या प्रवेशपरीक्षा एप्रिल-मे महिन्यांत असल्या तरी अर्ज भरण्याची तारीख ही डिसेंबर-जानेवारी महिन्यातच संपलेली आहे. त्यामुळे या संस्थांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना मुकावे लागते. आयआयटीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या खएए-टअकठ या परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेविषयी जशी शंभर टक्के जागरूकता असते तशी ती इतर प्रवेशपरीक्षांविषयी असत नाहीत. शाळा-महाविद्यालयांमधूनही या विषयी वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे.
आजमितीस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी, सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या संबंधित प्रवेशपरीक्षा पार पडल्या आहेत किंवा प्रवेशपरीक्षेच्या अर्जप्रक्रियेची मुदत उलटून गेली आहे. यंदा बारावी दिलेल्या विद्यार्थ्यांची जरी संधी हुकली असेल तरी पुढील शैक्षणिक वर्षांत बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संस्थांच्या प्रवेशप्रक्रियेकडे लक्ष ठेवावे. याचबरोबर डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस, नॅशनल डिफेन्स अॅकॅडेमी, नौदलातील १०+२ बीटेक एन्ट्री स्कीम, अशा काही प्रवेशपरीक्षा होतात, त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या परीक्षांच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती विविध प्रसारमाध्यमाद्वारे त्या त्या वेळी प्रकाशित होते. शाळा/महाविद्यालयांनी या अनुषंगाने पुढाकार घेऊन वेळावेळी आपल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणायला हवी.
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा