मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो आहे. वडासारखं असलं पाहिजे. कुठे रुजलं आहे तेच कळत नाही, पारंबीचाही वृक्ष होतो तसं माझं झालं. म्हणजे जे.जे.मधून बाहेर पडलो. मग बाबा आमटे आल्यानंतर वेगळं झालं किंवा ‘प्रहार’ चित्रपटाची गोष्ट डोक्यात असताना आर्मीत प्रवेश करावासा वाटला.. मग तीन र्वष तिथे होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला काय पाहिजे आहे, ते समजलं.
मला असं नेहमी वाटायचं की, माझ्या वडिलांचं माझ्यावर कमी लक्ष आहे. माझी भावंडं दिसायला सुंदर होती. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे असं मला वाटायचं. एकदा चौथीत असताना मुरुड-जंजिऱ्याला मी शाळेत नाटकात काम केलं होतं. ते पाहायला मुंबईहून वडील आले होते. तेव्हा मला वाटलं की, नाही, त्यांचं माझ्याकडेही लक्ष आहे. फक्त त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. पण, त्यांच्यासाठी म्हणून मी नाटकात काम करायला लागलो आणि जेव्हा जेव्हा मी नाटक करायचो, तेव्हा ते बघायला वडील यायचे.
सुलभाताई आणि अरविंद देशपांडेंनी मला नाटकात आणलं. टेनिसी विल्यम्सचा एक सिनेमा आला होता, ‘रोझ टॅटु’ नावाचा. त्याचं व्यंकटेश माडगूळकरांनी ‘गौराई’ म्हणून अॅडॉप्टेशन केलं होतं. त्यातल्या ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेसाठी मला घेतलं. त्याचं झालं असं की, मी ‘चांगुणा’ नाटकाची सतीश पुळेकरची तालीम बघायला गेलो होतो. तेव्हा सुलभा म्हणाली, ‘अरविंद, तो मुलगा आहे ना. तो चांगला आहे या भूमिकेसाठी.’ अशा तऱ्हेने मी नाटकात आलो. आणि पहिल्याच फटक्यात मला उत्तम अभिनयाचं पारितोषिक मिळालं, फायनललाही पारितोषिक मिळालं. मग मला आपण नट असल्याचा साक्षात्कार झाला. मग नोकरी करायची की पूर्णवेळ नाटक, या प्रश्नात मी नोकरी सोडून दिली. ‘पाहिजे जातीचे’ करत असताना मला २५ रुपये मिळायचे. ‘गौराई’ करताना मला प्रयोगाला १०० रुपये मिळायचे. त्यावेळी १०० रुपये मोठे होते. त्याला काहीएक किंमत होती. मोहन गोखलेकडे रहायचो. त्यामुळे राहण्याचा खर्च नव्हता. मला नाटकात काम करण्याचं एक कारण होतं, ते म्हणजे कळकळ. पैसा आणि नावलौकिक हे नव्हतं. मी नशीबवान होतो, मला कुठेही गोठवून राहावं लागलं नाही. गोठायला लागायच्या आधीच माझ्या बाजूला दुसरा कुठला तरी माणूस येऊन उभा राहायचा. मी तिथे वितळायचो.मग दुसरीकडे, तिसरीकडे..
..आणि मला साक्षात्कार झाला!
मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो आहे. वडासारखं असलं पाहिजे. कुठे रुजलं आहे तेच कळत नाही, पारंबीचाही …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-01-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व idea exchange बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And i realised