उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. उपयोजित कलांमध्ये शिल्पकला, चित्रकला आदींचा समावेश होतो.
उपयोजित कलांमध्ये प्रावीण्य प्राप्त केले आणि तंत्रावर हुकूमत मिळवली तर cr04कामाच्या विविध संधी चालत येतात. या संधींमध्ये अक्षर सुलेखन, पेज-लेआऊट, रेखांकन, इमेज मेकिंग आर्टस्टि, फिगर ड्रॉइंग, डिझायिनग, अर्कचित्रे, व्यंगचित्रे, कॉस्मेटिक फोटोग्राफी, इंडस्ट्रियल फोटोग्राफी, निसर्गचित्रण, मॉडेल छायाचित्रण आदींचा समावेश होतो. उपयोजित कलेच्या क्षेत्रात मुद्रणाला महत्त्वाचे स्थान आहे. याद्वारे नोकरीच्या-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. इंटिरिअर डिझायनर कल्पकता आणि परिश्रमाद्वारे करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतात. संगणकीय तंत्राचा उपयोग करून उपयोजित कलेतील तंत्रज्ञांना प्रगतीची नवी शिखरे गाठता येतात.
चित्रकलेत कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना जाहिरात, अ‍ॅनिमेशन, प्रकाशन संस्था, जाहिरात संस्था, नियतकालिके, वृत्तपत्रे आदी ठिकाणी विविध संधी मिळतात. पेहराव तसेच विविध वस्तूंच्या डिझाइन्स, विविध सण-समारंभप्रसंगी सजावट आदी अनेक ठिकाणी नोकरीची तसेच स्वयंरोजगाराची संधी
मिळू शकते.
हे अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी फ्री-लािन्सग करू शकतात. कला समीक्षा, कला रसग्रहण या क्षेत्रांतही करिअर करता येते. कला संग्रहालये, कला दालने, पोलीस विभाग (गुन्हेगार/ गुन्हेगारी घटना/ प्रसंग यांचे चित्रांकन करण्यासाठी), कॉर्पोरेट क्षेत्र, ज्वेलरी डिझायनिंग, शासकीय कार्यालयांमध्ये लागणारे कलाविषयक काम, चित्रपट उद्योग, डिझाइन स्टुडियो या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळतात.
सध्या अ‍ॅमिनेशनचे क्षेत्र झपाटय़ाने विस्तारत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, मुलांचे कार्यक्रम, जाहिराती यामध्ये चित्रांचा अधिकाधिक वापर केला जातो. संगणकीय तंत्राची जोड दिल्याने अद्भुत आणि चमत्कारिक चित्रसृष्टी बघायला मिळते. चित्रकलेचे तंत्रकौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात विपुल संधी मिळू शकतात. कॅलेंडर रेखाटने, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, देखावे आदी बाबींचे चित्रण करून त्याद्वारे प्रतिभावंत चित्रकार उत्तम उत्पन्न मिळवू शकतात. अशा चित्रकारांच्या कलाकृतींची प्रदर्शने सातत्याने भरतात. अभिजात कलाकृतींचा संग्रह करण्याकडे कलारसिकांचा ओढा
वाढत आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या स्तरापासून राज्यात कला शिक्षणाचा समावेश आहे. चित्रकला, हस्तकला यांना शालेय स्तरावर प्रोत्साहन दिले जाते. कला संचालनालयाद्वारे एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षा घेतल्या जातात. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चार वष्रे कालावधीच्या जी. डी. आर्ट पदविका अभ्यासक्रमांना (उपयोजित कला, रंग-रेखा कला आणि शिल्पकला) प्रवेश घेता येतो. त्यानंतर डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन आणि आर्ट मास्टर हे पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम करता येतात. डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना उच्च कला शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी प्राधान्य मिळू शकते. बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वष्रे कालावधीचा आर्ट टीचर डिप्लोमा पदविका अभ्यासक्रम
करता येतो.
उच्च कला शिक्षण : उच्च कला शिक्षणाच्या सुविधा राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पेंटिंग, टेक्स्टाइल डिझाइन, इंटिरिअर डेकोरेशन, शिल्पकाम, मेटल वर्क, सिरॅमिक्स यामध्ये स्पेशलायझेशन करता येते. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशासाठी महाराष्ट्र अप्लाइड आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एमएच-एएसी-सीईटी) घेतली जाते. ही परीक्षा कला संचालनालयामार्फत घेतली जाते. या परीक्षेद्वारे
६०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या संस्थांमध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट- मुंबई, सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट- मुंबई, गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट- औरंगाबाद आणि गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट- नागपूर या शासकीय संस्थांचा समावेश आहे.
या संस्थांमधील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
    =    सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट- मुंबई : बीएफए (पेंटिंग/ टेक्स्टाइल डिझाइन/ इंटेरिअर डेकोरेशन/ शिल्पकाम/ मेटल वर्क/ सेरॅमिक्स)
    =    सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट- मुंबई : बी.एफ.ए. अप्लाइड आर्ट
    =    गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट- औरंगाबाद : बीएफए (अप्लाइड आर्ट/ पेंटिंग/ टेक्स्टाइल डिझाइन)
    =    गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट- नागपूर : बीएफए (अप्लाइड आर्ट/ पेंटिंग)  
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावीमध्ये ४५ टक्के गुण. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण. विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये इंग्रजीचा अभ्यास केलेला असावा.
प्रवेश चाळणी परीक्षा : ही परीक्षा एकूण २०० गुणांची असते. यापकी प्रत्येकी ५० गुणांच्या तीन प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग प्रॅक्टिकल (कालावधी- एक तास), डिझाइन प्रॅक्टिकल (कालावधी- दीड तास), मेमरी ड्रॉइंग प्रॅक्टिकल (कालावधी- एक तास) यांचा समावेश असतो. ४० गुणांचा सामान्य अध्ययनाचा पेपर घेतला जातो. याचा कालावधी- ४५ मिनिटे. हा बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीचा पेपर असतो. या पेपरमध्ये कला, हस्तकला, डिझाइन, रंगसंगती, संगणकीय रेखांकन/ संगणकीय मूलभूत तत्त्वे या विषयांवर प्रश्न विचारले जातील. इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली असल्यास १० गुण, ब श्रेणी मिळाली असल्यास ६ गुण आणि क श्रेणी मिळाली असल्यास ४ गुण दिले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा दिलेली नसेल असे विद्यार्थी सीईटी परीक्षा देऊ शकतात. मात्र, वरील
१० गुणांचा लाभ त्यांना मिळू शकत नाही.
ल्ल    मास्टर ऑफ फाइन आर्ट्स : बी.एफ.ए. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना एम.एफ.ए.- मास्टर ऑफ फाइन आर्ट्स हा अभ्यासक्रम करण्याची संधी मिळते. डिझायिनगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी बीएफए ही शैक्षणिक अर्हता ग्राहय़ धरली जाते. काही विद्यापीठांमध्ये दृक्-कला (व्हिज्युएल आर्ट) शिक्षणामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि संशोधनात्मक (पीएच.डी) अभ्यासक्रमही करता येतो.
    पत्ता- कला संचालनालय, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट,
मुंबई- ४००००१. वेबसाइट- http://www.doa.org.in
ल्ल    मास्टर ऑफ डिझाइन : बीएफए हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना देहराडूनच्या युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीजने सुरू केलेल्या डिझाइन क्षेत्रातील एम. डिझाइन इन- ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, इंटरअ‍ॅक्शन डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, इंडस्ट्रियल डिझाइन या स्पेशलायझेशनच्या शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यासाठी संस्थेची डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागते.  
वेबसाइट- http://www.upes.ac.in

नया है यह!
डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहूड स्पेशल एज्युकेशन-
हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मेन्टली हॅन्डिकॅप्ड या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. कालावधी- एक वर्ष. पत्ता- मनोविकास नगर, सिकंदराबाद- ५००००९, तेलंगणा. वेबसाइट- http://www.nimhindia.org

Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
98th All India Marathi Literary Conference
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Marathi people from abroad , Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद
Marathi Movie Review M Po Bombilwadi Director Paresh Mokashi
रंगतदार प्रहसननाट्य
loksatta lokankika three winners
‘लोकसत्ता लोकांकिका’ विजेत्या एकांकिका पुन्हा पाहण्याची संधी, उरणमधील ‘जेएनपीटी’च्या सभागृहात ४ जानेवारीला ‘नाट्योत्सव’
Story img Loader