‘शेतीचे चुकीचे नियोजन, उद्योगांवर भर देण्याच्या नादात ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष, इंधनावरील नियंत्रण उठविण्याच्या निर्णयात दिरंगाई, उत्पादन क्षेत्रात कल्पकतेचा अभाव, सिंचनखर्चात कपातीची गल्लत.. एकूणच, नियोजनाच्या ढिसाळपणामुळे विषमता वाढत आहे आणि त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. समस्याग्रस्त ग्रामीण जनता उपेक्षित राहिली आहे आणि त्याचा फायदा घेत प्रादेशिक पक्ष राजकारण करत आहेत. त्यातूनच जातीपातींचे राजकारण फोफावत आहे..’ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीळकंठ रथ यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये देशाच्या अर्थकारणाचे व त्याच्या सामाजिक-राजकीय परिणामांचे अनेक पदर उलगडले. काही निर्णय कठोर असले तरी घ्यावेच लागतात, त्याची किंमत ही मोजावीच लागते. पण त्याच्या परिणामांतून जनतेला दिलासा कसा मिळेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज असते, असे त्यांचे मत आहे. डॉ. रथ यांच्या चिंतनाचा हा वृत्तान्त..
ढिसाळ नियोजनामुळे जातीय-प्रांतीय राजकारण फोफावले
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषिक्षेत्रावर भर होता. पण दुसऱ्या योजनेत उद्योगावर भर देण्यात आला. कृषिक्षेत्राचा विचार अन्नाची गरज भागवण्यापुरताच झाला. उद्योगांवर भर देण्याच्या नादात प्रत्येक गावाचा सर्वागीण विकास ही ग्रामीण जनतेसाठी स्वातंत्र्याची अनुभूती आहे याचा विसर पडला. प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने शहराला जोडले जावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, प्राथमिक शाळा असावी, प्राथमिक शाळा असेल तेथे माध्यमिक शाळा व्हावी हा विचार झालाच नाही. प्राथमिक शिक्षण सर्वाना मिळावे याकडे दुर्लक्ष झाले. २०-२५ वर्षांत प्रत्येक गावात या सर्व सुविधा असाव्यात या दृष्टीने पंचवार्षिक योजनेत नियोजन सुरू व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही.
या त्रुटींमुळे शिक्षण हे वरच्या जाती आणि सरकारी नोकरीत शिरलेले लोक यांच्यापुरतेच मर्यादित राहिले. साहजिकच प्रगतीची संधी त्यांनाच मिळत गेली. ज्याला आपण सर्वसाधारणपणे बहुजन समाज म्हणतो त्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाजात शिक्षणाचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. त्यामुळे त्यांना प्रगतीची संधी कमी मिळाली. साधारणपणे १९८० च्या दशकात या बहुजन समाजातील राजकीय कार्यकर्ते, पुढारी सजग झाले. त्यांच्यातील राजकीय जागरूकता वाढली. सरकार-प्रशासन, समाज सर्वत्र विशिष्ट गटातील लोकच पुढे आहेत. वरच्या पदांवर, सत्तास्थानांवर वरच्या जातीतील लोकच जास्त आहेत, असे त्यांना दिसून आले. पण या सर्वाच्या मुळाशी शिक्षण आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे या तथाकथित वरच्या जातींनी जाणूनबुजून आपल्याला वंचित ठेवले, प्रगतीची संधी देत नाहीत, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. वरच्या जातींबाबतचा राग असे या संघर्षांचे स्वरूप झाले. नियोजनकारांनी हे जाणीवपूर्वक केले नसले तरी ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने होणारे सामाजिक-आर्थिक परिणाम नियोजनकारांच्या लक्षात आले नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळे बहुजन समाज व त्यांचे प्राबल्य असलेला ग्रामीण भाग प्रगतीपासून वंचित-उपेक्षित राहिला. या रागातून ओबीसी आणि मागासवर्गीयांचे राजकारण वेगाने पुढे आले. वेगवेगळय़ा राज्यांत ते प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे आले. यातूनच मुलायम सिंह, लालूप्रसाद यादव यांसारखे नेते सत्तेवर आले आणि टिकले. सत्तेतूनच आपली प्रगती, कल्याण होणार असा त्यांचा समज राहिला. आपल्या मागासपणाचे मूळ कारण शिक्षणाचा अभाव, विकासाचा अभाव हे असल्याचे लक्षात न आल्याने जातीवर-प्रदेशावर आधारित राजकारण सुरू राहिले. विकासाची समज नसल्याने शिक्षण आणि विकासाचे इतर मुद्दे या लोकांच्या राजवटीत बाजूला राहिले. अशीच दहा-पंधरा वर्षे गेली. बहुजन समाजालाही ते कालांतराने उमजले. या शतकाच्या आरंभी ‘सडक-बिजली-पानी’सारख्या विकासाच्या मुद्दय़ांवर आधारित राजकारण सुरू झाले.
वंचितांच्या समस्यांचे मूठभरांकडून भांडवल
‘शेतीचे चुकीचे नियोजन, उद्योगांवर भर देण्याच्या नादात ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष, इंधनावरील नियंत्रण उठविण्याच्या निर्णयात दिरंगाई, उत्पादन क्षेत्रात कल्पकतेचा अभाव, सिंचनखर्चात कपातीची गल्लत..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-02-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व idea exchange बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deprived problems are capialised by some people