देशाच्या विकासात ऊर्जा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. ऊर्जा निर्मितीवर केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांनी लक्ष केंद्रित केले आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी वेगवेगळ्या विषयातील तंत्रज्ञांची गरज भासते. ही गरज भागविण्यासाठी नॅशनल पॉवर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट या संस्थेने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
नॅशनल पॉवर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट :
= एमबीए (पॉवर मॅनेजमेंट) : या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असून तो महर्षी दयानंद युनिव्हर्सटिी-
= बी.टेक./ बी.ई.- पॉवर इंजिनीअिरग (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल) : ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक संयंत्रांची उभारणीचे नियोजन, प्रत्यक्ष उभारणी, कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती, संरक्षण, विजेचे वितरण आणि वहन अशा विविध बाबींसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते. ही कामे ऊर्जा अभियंत्यांची असतात. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेने हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारचा
हा देशातील पहिलाच अभ्यासक्रम आहे.
= हा अभ्यासक्रम नॅशनल पॉवर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, नागपूर आणि दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला आहे. प्रवेश जागा- ६०. कॉमन अॅडमिशन प्रोसेसद्वारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी खएए-टअकठ परीक्षा देणे आवश्यक आहे. पत्ता- दक्षिण अंबाझरी रोड, गोपाल नगर, नागपूर- ४४००२२.
संस्थेची वेबसाइट- http://www.nptinagpur.com
ई-मेल- director@nptinagpur.com
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन थर्मल पॉवर प्लान्ट इंजिनीअिरग : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर चाचणी परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम नागपूर, दुर्गापूर, बद्रापूर गुवाहाटी, नांगल, न्येवेली येथे करता येतो. कालावधी- ५२ आठवडे. अर्हता- बी.ई.
= पोस्ट डिप्लोमा इन थर्मल पॉवर प्लान्ट इंजिनीअिरग : कालावधी- ५२ आठवडे. अर्हता- इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका. औष्णिक ऊर्जा केंद्रांची देखभाल आणि कार्यान्वयन प्रक्रियेत असणाऱ्या व्यक्तींच्या तांत्रिक कौशल्यात वाढ होण्यासाठी या अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम दुर्गापूर, गुवाहाटी, बद्रापूर, नांगल या ठिकाणी चालवला जातो.
= सर्टििफकेट कोर्स इन पॉवर डिस्ट्रिब्युशन : या अभ्यासक्रमाचा कालावधी २६ आठवडे असून तो एनपीटीआय, नागपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने दूरस्थ शिक्षणपद्धतीने सुरू केला आहे.
= ग्रॅज्युएट इंजिनीअिरग कोर्स (थर्मल) : औष्णिक ऊर्जा केंद्रांच्या देखभाल आणि कार्यान्वयनासाठी व्यवस्थापकीय व तांत्रिक कौशल्य नव्या अभियंत्यांनी प्राप्त करावीत, यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी-
५२ आठवडे. हा अभ्यासक्रम नवेली येथे चालविण्यात येतो.
= पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इंजिनीअर्स कोर्स (ऑपरेशन अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम)- वीज वितरण आणि वहन क्षेत्रातील तांत्रिकदृष्टय़ा तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी- २६ आठवडे.
अर्हता- इलेक्ट्रिकल शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
हा अभ्यासक्रम नवेली, नागपूर, बेंगळुरू, गुवाहाटी येथे चालविण्यात येतो.
= सुपरवायझर/ ऑपरेटर कोर्स (हायड्रो) : जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल आणि कार्यान्वयनासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान या अभ्यासक्रमाद्वारे संबंधितांना दिले जाते. हा अभ्यासक्रम नांगल येथे सुरू करण्यात आला असून त्याचा कालावधी- ३९ आठवडे. अर्हता- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील पदविका.
= अॅडव्हान्स डिप्लोमा इन जीआयएस अॅण्ड रिमोट सेन्सिंग : या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मितीकरता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम फरिदाबाद येथे चालवला जातो. कालावधी- २६ आठवडे. अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर अभियांत्रिकीमधील पदविका किंवा भूगोल/ भूगर्भशास्त्र/ कृषी/ पर्यावरण या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
पत्ता- नॅशनल पॉवर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट कॉर्पोरेट सेंटर अॅण्ड सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट अॅण्ड पॉवर स्टडीज, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, फरिदाबाद. वेबसाइट- http://www.npti.in ई-मेल- nptifaridabad@npti.in
स्कूल ऑफ इंजिनीअिरग :
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी : अॅडव्हान्स्ड सर्टििफकेट इन पॉवर डिस्ट्रिब्युशन मॅनेजमेंट. कालावधी- किमान सहा महिने. अर्हता- अभियांत्रिकी पदवी किंवा पदविकाधारक. पत्ता- स्कूल ऑफ इंजिनीयिरग, आयजीएनओयू, नवी दिल्ली- ११००६८.
ई-मेल- sote@ignou.ac.in
कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, पुणे :
= मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॉवर सिस्टीम्स = मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कंट्रोल सिस्टीम. अर्हता- बीई (इलेक्ट्रिकल) = मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन थर्मल इंजिनीअिरग. अर्हता- बीई (इलेक्ट्रिकल).
पत्ता- डायरेक्टर कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, पुणे.
वेबसाइट- http://www.coep.org.in
सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अॅण्ड पॉवर :
केंद्र सरकारने देशातील जलसिंचन आणि ऊर्जा क्षेत्राचे संनियंत्रण करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अॅण्ड पॉवर या संस्थेची स्थापना केली आहे. त्याखेरीज ही संस्था जलसिंचन, ऊर्जा विकासासाठीही कार्यरत आहे. या संस्थेने सुरू केलेले अभ्यासक्रम-
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टिम्स : कालावधी- २६ आठवडे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअिरग). शिवाय उमेदवाराला दहावी-बारावीमध्येही किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत.
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन थर्मल पॉवर प्लान्ट इंजिनीअिरग: कालावधी ५२ आठवडे आहे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीअिरग) उमेदवारांची निवड वर नमूद तिन्ही परीक्षेतील गुणांनुसार केली जाते. पत्ता- सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अॅण्ड पॉवर, चाणक्य पुरी, न्यू दिल्ली- ११००२१.
ई-मेल- cbip@cbip.org वेबसाइट- http://www.cbip.org
नया है यह!
एम.एस्सी. इन अॅग्रिकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट –
हा अभ्यासक्रम धीरुभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह कृषी/ विज्ञान/ वाणिज्य/ अर्थशास्त्र/ अभियांत्रिकी विषयातील पदवी.
पत्ता- इंद्रोदा सर्कल, गांधी नगर, गुजरात- ३८२००७. वेबसाइट- http://www.daiict.ac.in
ऊर्जेसंबंधित अभ्यासक्रम
देशाच्या विकासात ऊर्जा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. ऊर्जा निर्मितीवर केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-05-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educational course on energy and power