लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळत असून बुधवारी संध्याकाळी टिळक रस्त्यावरील ‘जे. के. एन्टरप्राइज’च्या दालनात या उपक्रमातील १७ भाग्यवान विजेत्यांना फ्रीज, एलईडी टी.व्ही, सोन्याची नाणी, पैठणी, मोबाइल संच, गिफ्ट व्हाऊचर अशी भरगच्च पारितोषिके जे.के.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत भट यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ‘लोकसत्ता’चे जाहिरात व्यवस्थापक सुब्रतो घोष उपस्थित होते.
गेल्या महिन्यात २४ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. या फेस्टिव्हलमध्ये दर दिवशीच्या भाग्यवान विजेत्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात येत आहेत.
‘जे. के. दालनातील कार्यक्रमात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यानच्या १७ भाग्यवान ग्राहकांना पारतोषिके देण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रज्ञा पवार (ठाणे) यांना फ्रिज, सचिन चव्हाथे (ठाणे) यांना एलईडी टीव्ही मिळाला. या अचानक लाभामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मंजूषा भट, तेजस मंचेकर, मकरंद करंदीकर यांना सोन्याची राजमुद्रा मिळाली. त्याचबरोबर नंदिनी चिंदरकर, दीपक आचरेकर, नीरज आनंद, कल्पना मुळे, मयूरी दीपक, मेघा पाटील, चारुदत्त मुंढे, अजय कुऱ्हेकर, उमा केळुस्कर, श्वेता चारी, शेखर पराडकर, अमित अरबट्टी, वर्षां पालवणकर यांनाही पारितोषिके मिळाली.  
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या शहरांमधील ७५हून अधिक दुकानांमध्ये खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी भाग्यवान विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणेतर्फे  पैठणी साडी, पॅपिलॉन-ठाणेकडून मोबाईल संच, कलानिधी-ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्डकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे एका भाग्यवान ग्राहकास संघवी समूहाकडून कार आणि पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूर सहल पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.  
खरेदी करा आणि जिंका…
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणारे भाग्यवान ग्राहक बक्षिसांचे विजेते ठरत आहेत. खरेदीचे बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्यांची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाग्यवंतांच्या प्रतिक्रिया
मुलींचा पायगुण
माझ्या दोन्ही मुली चांगल्या पायगुणाच्या आहेत. त्यांना कोठेही खरेदीसाठी नेले की नक्कीच काहीतरी लाभ होतो असे माझे मत आहे. यावेळीही असेच घडले. दोन्ही मुली सोबत असल्याने बक्षिसाची अपेक्षा होती. चक्क फ्रीज मिळाल्याने खूप आनंद झाला.
प्रज्ञा पवार, ठाणे 

पहिलेच बक्षीस
खरेदीनंतर असे काही बक्षीस मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मात्र अचानक सोन्याच्या राजमुद्रेचा लाभ झाल्याने खूप आनंद झाला. हे मला मिळालेले पहिलेच बक्षीस आहे.
मंजूषा भट

लोकसत्ताकडून सन्मान
निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या ‘लोकसत्ता’सारख्या दर्जेदार वर्तमानपत्राकडून हा सन्मान होतोय असे मला वाटते. मिळालेल्या बक्षिसापेक्षा निर्भीड, सच्चाईने पत्रकारिता करणाऱ्या ‘लोकसत्ता’ने हे बक्षीस देऊन अनेक वर्षांंचा वाचक म्हणून माझा सन्मान केला आहे. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे.
सचिन चव्हाथे