माध्यम क्षेत्रातील पत्रकारिता, संवाद संप्रेषण आणि जनसंपर्क अशा विविध अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात
गेल्या काही वर्षांत माध्यम क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि या क्षेत्रात करिअरच्या विविध संधीही निर्माण होत आहेत. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातील काही अभ्यासक्रमांना बारावीनंतर तर काही अभ्यासक्रमांना पदवीनंतर प्रवेश घेता येतो. या क्षेत्रातील उत्तम वृत्तपत्रे अथवा दूरचित्रवाणी माध्यमांत नोकरी मिळण्यासाठी आज पदवीनंतर पत्रकारिता या विषयातील पदवी आवश्यक ठरू लागली आहे. देशातील काही वैशिष्टय़पूर्ण संस्थांमधील पत्रकारिता, संवाद संप्रेषण (कम्युनिकेशन), जनसंपर्क अभ्यासक्रमांची ओळख या लेखातून करून घेऊयात –
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत –
* पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझम- इंग्रजी.
एकूण जागा- ४०.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझम- हिंदी.
एकूण जागा- ४०.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेडियो अँड टेलिव्हिजन जर्नालिझम.
एकूण जागा- ३०.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हर्टायजिंग अँड पब्लिक रिलेशन.
एकूण जागा- ४५
या अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरांना प्रवेश मिळू शकतो. कालावधी- प्रत्येकी एक वर्ष. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा मे महिन्यात देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश आहे. त्यानंतर मुलाखती जुलैच्या पहिल्या आठवडय़ात घेतल्या जातात. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते. ऑगस्ट महिन्यात पहिल्या सत्राचा प्रारंभ होतो. अर्ज ऑनलाइनसुद्धा भरता येतो. हा अर्ज http://www.iimc.nic.in या वेबसाइटवर ठेवण्यात आला आहे. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, अरुणा आसफ अली मार्ग, न्यू दिल्ली- ११००६७.
या देशस्तरीय संस्थेचे एक केंद्र २०११ साली अमरावती येथे उघडण्यात आले आहे. सध्या हे केंद्र संत गाडगे महाराज विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत असून, त्यामध्ये सर्व अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये महाराष्टातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची उत्तम संधी मिळू शकते.
* सेंट झेवियर महाविद्यालय- या संस्थेत बॅचलर ऑफ मास स्टडीज हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करण्यात आला आहे. ६० टक्के गुणांसह (अल्पसंख्याक संवर्ग- ५५ टक्के आणि राखीव संवर्ग- ५० टक्के) कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. तिसऱ्या वर्षांला जाहिरात आणि पत्रकारिता या विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सुविधा दिली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ऑनलाइन अर्ज http://www.xaviers.edu या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्ता- ५, महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१. ई-मेल- webadmin@xavier.edu
* एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रिंट, न्यू मीडिआ, टेलिव्हिजन आणि रेडियो या चार विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेश परीक्षेद्वारे अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. पत्ता- रजिस्ट्रार, एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम, सेकंड मेन रोड, तरामणी,
चेन्नई- ६००११३. ई-मेल- asian_media@asianmedia
* एजेके कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जामिया मिलिआ इस्लामिया युनिव्हर्सिटी- या संस्थेने, एमए इन मास कम्युनिकेशन, एमए इन नॉनव्र्हजन्ट जर्नालिझम, एमए इन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. पत्ता- मौलाना मोहम्मद अली जौहर मार्ग, नवी दिल्ली- ११००२५. वेबसाइट- http://www.ajkmcrc.org
ई-मेल- admissions@ajkmcrc.org
* सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन- या संस्थेने बॅचलर ऑफ मीडिया स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत जर्नालिझम, रेडिओ अँड टीव्ही प्रॉडक्शन, अॅडव्हर्टायजिंग पब्लिक रिलेशन अॅण्ड इव्हेंट्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या अभ्यासक्रमाला सिम्बॉयसिसतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, २३१, विमाननगर, पुणे-४११०१४.
ई-मेल- contactus@simcug.edu.in
वेबसाइट- http://www.simcug.edu.in
* इंडियन इन्स्टिटय़ूट जर्नालिझम अॅण्ड न्यू मीडिया- या संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
* ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रिंट, ब्रॉडकास्ट किंवा ऑनलाइन, मल्टिमीडिया (अर्हता- बारावी उत्तीर्ण),
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रिंट/ बॉडकास्ट किंवा ऑनलाइन/ मल्टिमीडिया (अर्हता- पदवी उत्तीर्ण)
पत्ता- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, नंबर- ५०२, फिफ्थ सी, मेन, फिफ्थ क्रॉस, सेकंड ब्लॉक, एचआरबीआर लेआऊट, कल्याणनगर, बंगलोर- ५६००४३.
वेबसाइट- http://www.iijnm.org
ई-मेल- admin@iijnm.org
* मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन अॅडव्हर्टायजिंग अॅण्ड पब्लिक रिलेशन्स हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ब्रँडिंग, अॅडव्हर्टायजिंग, मीडिया, मार्केटिंग रिसर्च, सोशल अँड डेव्हलपमेंट कम्युनिकेशन्स आणि पब्लिक रिलेशन या क्षेत्रात उच्च दर्जाचे व्यावसायिक निर्माण व्हावेत या हेतूने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेशासाठी बारावी, पदवी परीक्षेतील गुण आणि अॅप्टिटय़ूड टेस्टचा आधार घेतला जातो. पत्ता- अॅडमिशन ऑफिस, मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद, शेला, अहमदाबाद- ३८००५८ गुजरात. ई-मेल- admissionsenquiry@micamail.in वेबसाइट- http://www.mica.in
* डिपार्टमेन्ट ऑफ कम्युनिकेशन अॅण्ड जर्नलिझम- पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या विभागामार्फत मास्टर ऑफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. पत्ता- डिपार्टमेन्ट ऑफ कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम, रानडे इन्स्टिटय़ूट बिल्डिंग, फग्र्युसन कॉलेज रोड, पुणे- ४११००१.
वेबसाइट- unipune.ac.in ईमेल- head.dcj@gmail.com
* मनोरमा स्कूल ऑफ कम्युनिकेशन- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रिंट जर्नालिझम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. पत्ता- इरायीकडावू, कोट्टायम- ६८६००१.
ई-मेल- info@manoramajschool.com
वेबसाइट- http://www.manoramajschool.com
* भारतीय विद्या भवन, दिल्ली- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पदवी परीक्षेच्या गुणांवर आधारित या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. पत्ता- कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१.
वेबसाइट- http://www.bvbdellhi.inई-मेल- info@bvbdellhi.in
माध्यमांच्या जगात
माध्यम क्षेत्रातील पत्रकारिता, संवाद संप्रेषण आणि जनसंपर्क अशा विविध अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात
First published on: 28-05-2014 at 03:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalism career information