दूरसंवेदन (Remote Sensing)-
कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता, त्यासंबंधी माहिती मिळविणे म्हणजे दूरसंवेदन. आपण जेव्हा एखाद्या कॅमेऱ्याने फोटो घेतो तेव्हा तोदेखील दूरसंवेदनाचाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील माहिती संकलित करण्यासाठी दूरसंवेदनाच्या माध्यमातून ज्या उपग्रहांची मदत घेतली जाते त्यांना दूरसंवेदी उपग्रह (Remote Sensing Satellites) असे म्हणतात. दूरसंवेदनतंत्रामुळे भौगोलिक, भूगर्भविषयक, सागरविषयक, हवामान व पर्यावरणविषयक माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.
दूरसंवेदन तंत्राची वैशिष्टय़े/ उपयोग-
१) पृथ्वीवरील वस्तूंनी परावर्तित केलेल्या, पसरविलेल्या किंवा पुनर्परावर्तित केलेल्या सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांच्या मोजमापावरून असे आकलन केले जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पट्टय़ातील दृश्य प्रकाश, इन्फ्रारेड किरण आणि मायक्रोवेव्ह किरणांचा त्यासाठी वापर केला जातो.
२) दूरसंवेदनासाठी विमान व कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो.
३) १९९०नंतर मानवरहित दूरसंवेदनाची सुरुवात झाली.
४) दूरसंवेदनामार्फत मिळवलेल्या माहितीचा वापर लगेच केला जात नाही. ती माहिती सर्वप्रथम बेस स्टेशनकडे पाठविली जाते, तेथे त्याचे विश्लेषण होते व नंतर माहिती वापरली जाते.
५) हवाई छायाचित्रणापेक्षा उपग्रहाद्वारे केले जाणारे भूसर्वेक्षण आíथकदृष्टय़ा स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे.
६) दूरसंवेदनामार्फत मिळणारी माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने, पूर्वग्रहरहित व पूर्ण विश्वासार्ह असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.
७) टोपोशिट तयार करण्यासाठी (नकाशा) दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर होतो.
८) भूपृष्ठावरील व भूपृष्ठांतर्गत खनिजे, पाण्याचा साठा, धरणातील पाणीसाठा, धरणाची उंची, खोली व पाणी साठवण क्षमता दूरसंवेदनाचा वापर करून सांगता येते.
९) वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण, जीवपुरातत्त्व विषयांसाठी याचा वापर केला जातो.
१०) दूरसंवेदनामुळे व्यापक व दुर्गम भागाची व्यवस्थित माहिती मिळविता येते. वलीकरण व प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या भूवैशिष्टय़ांचा अभ्यास करता येतो. शिवाय भूकंप, ज्वालामुखी, वणवा, महापूर, वादळे इ. नसíगक आपत्तींचा अभ्यास करता येतो.
उपग्रह पृथ्वीपासून ज्या उंचीवर स्थिर केले जातात, त्यांना कक्षा असे म्हणतात. कक्षा दोन प्रकारच्या असतात. १) सूर्यस्थिर कक्षा २) भूस्थिर कक्षा
१) सूर्यस्थिर कक्षा / उपग्रह – (Sun- Synchronous Orbit)
* या कक्षेत मुख्यत (IRS) उपग्रह सोडले जातात.
* ही कक्षा जवळजवळ वर्तुळाकार अशी ध्रुवीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह उत्तर ते दक्षिण असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० कि.मी. एवढय़ा निश्चित उंचीवर सोडले जातात.
* या उपग्रहाची व्याप्ती क्षेत्र ८१अंश N  ते ८१ अंश S इतके असते.
भारतीय दूरसंवेदन उपग्रह (Remote Sensing Satellite) जवळजवळ वर्तुळाकार अशा ध्रुवीय सूर्य स्थिर कक्षेत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० किमी अंतरावर सोडले जातात. ते उत्तर ते दक्षिण या दिशेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.
२) भूस्थिर कक्षा / उपग्रह (Geo – Synchronous Orbit)
* ही कक्षा वर्तुळाकार अशी विषुववृत्तीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किमी अंतरावर सोडले जातात.
* या उपग्रहास पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास लागतात.
हवाई छायाचित्रण (Aerial Photography)
जेव्हा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचे सर्वेक्षण कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो घेऊन केले जाते, तेव्हा त्यास छायामिती (Photogrammetry) असे म्हणतात, याचे दोन प्रकार पडतात.
१)भूछायाचित्रण- जेव्हा कॅमेऱ्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाहून छायाचित्र घेतले जाते तेव्हा त्यास भूछायाचित्रण असे म्हणतात.
२)जेव्हा विमानातून कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेतली जातात तेव्हा त्यास हवाई छायाचित्रण असे म्हणतात.
हवाई छायाचित्रणासाठी वापरले जाणारे कॅमेरे व फिल्म्स- हवाई छायाचित्रणासाठी विमानात विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसविलेले असतात. विमानाचा वेग जास्त असल्यामुळे कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या कॅमेऱ्यात अतिजलदतेने उघडझाप करणारी झडप असते, वेगाने छायाचित्र घेणारी भिंगे असतात. जलदपणे परिणाम होणारी अतिसंवेदक फिल्म असते. तसेच कॅमेऱ्यात जास्तीतजास्त छायाचित्रे सामावून घेणारे कप्पे असतात.
छायाचित्रांची स्पष्टता कॅमेऱ्यांवर अवलंबून असते. ज्या वेळी कॅमेऱ्यातील नाभी अंतर कमी असते अशा प्रकारच्या कॅमेऱ्याला वाइड अँगल कॅमेरा असे म्हणतात. या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी अधिक प्रमाणात क्षेत्र व्याप्त केले जाते, त्यामुळे त्या क्षेत्रातील भूवैशिष्टय़े स्पष्टपणे छायांकित होत नाहीत. ज्या वेळी कॅमेऱ्यातील नाभी अंतर जास्त असते, अशा कॅमेऱ्याला नॅरो अँगल कॅमेरा असे म्हणतात. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी कमी प्रमाणात क्षेत्र व्यापले जाते. यामध्ये प्राप्त झालेल्या छायाचित्रांची स्पष्टता अधिक असून लहान भूवैशिष्टय़ेसुद्धा स्पष्टपणे छायांकित होतात.
कॅमेऱ्याचे प्रकार  
१) फ्रेिमग कॅमेरा- हवाई छायाचित्रणासाठी सामान्यपणे याच प्रकारचा कॅमेरा वापरला जातो. फ्रेमद्वारे छायाचित्र घेतले जात असल्याने यास फ्रेिमग कॅमेरा म्हणतात.
२) पॅनोरॅमिक कॅमेरा- या कॅमेऱ्यातील भिंग स्थिर नसते. त्यामुळे हवाईचित्रणासाठी या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फारसा उपयोग करत नाहीत.
३) स्ट्रिप कॅमेरा- या प्रकारच्या कॅमेऱ्यात भिंग स्थिर स्वरूपाचे असते, परंतु फिल्म मात्र सतत फिरती असते.

यूपीएससी : मूलभूत हक्क (भाग ३)
कलम २२- या कलमात असे स्पष्ट करण्यात आले आहे, की (१) जर एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळवल्याशिवाय अटकेत ठेवले जाणार नाही. तसेच त्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारता येणार नाही.
१) अटक केलेल्या व्यक्तीला २४ तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर उभे करण्यात येईल आणि मॅजिस्ट्रेटच्या हुकमाशिवाय तिला अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही. या अधिकारांना दोन अपवाद आहेत. अ) जो ज्या वेळी परकीय शत्रू म्हणून गणला गेला असेल किंवा ब) जो प्रतिबंधक अटकेच्या कायद्यान्वये अटकेत ठेवला असेल त्यांच्या बाबतीत हे अधिकार लागू नाहीत. २) प्रतिबंधक अटकेसंबंधी केलेला कोणताही कायदा कोणाही व्यक्तीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवण्यास अधिकार देणार नाही. परंतु सल्लागार मंडळाने शिफारस केल्यास तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ त्या व्यक्तीला अटकेत ठेवता येईल.
भारतीय घटनेतील जी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याची तरतूद केलेली आहे, ती व्यक्तिस्वातंत्र्याला मारक आहे, कारण कोणत्याही व्यक्तीला कोणतेही कारण न दाखवता अटक करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झालेला आहे. देशाची सुरक्षितता, संरक्षण परराष्ट्रीय संबंध, घटक राज्यांची सुरक्षितता इ. धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
घटनेच्या २२ (७) या कलमानुसार संसदेला काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ अटकेत ठेवावयाचे असेल तर त्यासंबंधी पार्लमेंटला तसा कायदा पास करावा लागेल आणि त्या कायद्यानुसार सल्लागार मंडळ नेमावे लागेल. सल्लागार मंडळाचे सदस्य, उच्च न्यायालयाचे आजी, माजी न्यायमूर्ती असे लोक असले पाहिजेत. सल्लागार मंडळाने चौकशीकरिता कोणती पद्धती अनुसरावी हे ठरवण्याचे अधिकार संसदेला आहेत. सल्लागार मंडळाने स्थानबद्धता योग्य आहे असा निर्णय दिल्यास सरकार ती स्थानबद्धता कायम करील आणि उलट निर्णय दिल्यास त्या अटक झालेल्या व्यक्तीला सरकारने ताबडतोब सोडले पाहिजे. या कायद्यानुसार व्यक्तीला जास्तीतजास्त बारा महिने अटकेत ठेवता येईल.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
indonesia tsunami 2004 (1)
दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?

महत्त्वाचे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदे-
*१९५०चा प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा
* १९७१चा अंतर्गत सुरक्षा कायदा (मिसा)
* १९८०चा राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका)
* १९८५चा दहशतवादी व फुटीर कारवाया प्रतिबंधक कायदा (टाडा) (१९९५ मध्ये रद्द केला.)
* २००२चा दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा) (२००४मध्ये रद्द करण्यात आला.)
शोषणाविरुद्धचा हक्क (कलमे २३ व २४)
कलम २३- माणसांची विक्री, वेठ आणि बिगारी यावर बंदी घातली आहे. याचा भंग केल्यास गुन्हा ठरवला जातो. या कृतींसाठी शिक्षा म्हणून सरकारने अनतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा १९५६ हा कायदा संमत केला आहे.
अपवाद- कलम २३ने या हक्कास एक अपवाद सांगितला आहे. राज्यसंस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते व असे करताना धर्म, वंश, जात व वर्ग या कारणांवरून भेदभाव करणार नाही. उदा. अनिवार्य लष्करी सेवा किंवा समाजसेवा.
कलम २४- १४ वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा कोणत्याही जोखमीच्या जागी काम करण्यास बंदी करण्यात आली आहे. बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा, १९८६ हा त्याविषयीचा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. इतरही कायद्यांतर्गत बालकामगारांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलमे २५ ते २८)
कलम २५- सर्व व्यक्तींना आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचे तसेच आपल्या धर्माचा आचार, विचार व प्रचार करता येईल. कलम २५च्या शेवटी दोन स्पष्टीकरणे देण्यात आलेली आहेत-
१) कृपाण धारण करणे व स्वत:बरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल.
२) हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन वा बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचाही उल्लेख समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल.
कलम २६- भारतीय नागरिकांना आपल्या धर्मप्रचारासाठी धार्मिक संस्था स्थापन करण्याचा व त्या संस्था चालवण्याचा, धर्मविषयक बाबतीत कारभार पाहण्याचा, स्थावर व जंगम मालमत्ता मिळवण्याचा आणि त्यासंबंधी कारभार पाहण्याचा हक्क दिला आहे.
कलम २५ व कलम २६ मधील फरक- कलम २५ व्यक्तींच्या धार्मिक हक्कांना संरक्षण प्रदान करते, तर कलम २६ धार्मिक संप्रदायांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करते. दुसऱ्या भाषेत, कलम २६ धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य संरक्षित करते.
कलम २७ – धर्मप्रचारासाठी आवश्यक असलेला पसा उभा करण्यासाठी सक्तीने कर लादले जाणार नाहीत.
कलम २८- सरकारमान्य किंवा शासकीय अनुदानातून चालविलेल्या शिक्षणसंस्थेत विद्यार्थ्यांना विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही.

Story img Loader