सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र
२) पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र (Appellate Jurisdiction)- देशातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते अशा निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त
झाला आहे.
सर्वोच्च न्यायालय खालील बाबतीत पुनर्निर्णय देते.
१) घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचे खटले २) दिवाणी खटले ३) फौजदारी खटले
१) घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचे खटले- कलम १३२ अन्वये उच्च न्यायालयाने एखाद्या खटल्यासंबंधी त्या खटल्यात अर्थ लावण्यासंबंधी कायद्याचा महत्त्वाचा प्रश्न अंतर्भूत झाला आहे, असा दाखला दिला असल्यास त्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते, परंतु एखाद्या खटल्यात घटनेचा अर्थ लावण्याबाबत कायद्याचा महत्त्वाचा प्रश्न अंतर्भूत झाला आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटल्यास ते त्या खटल्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची खास परवानगी देऊ शकते.
२) दिवाणी खटला- राज्यघटनेच्या कलम १३३ अन्वये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, परंतु त्याकरिता उच्च न्यायालयाने पुढील दाखला देणे आवश्यक आहे.
अ) त्या खटल्यात कायद्याचा महत्त्वाचा प्रश्न अंतर्भूत झालेला आहे.
ब) उच्च न्यायालयाच्या मते त्या प्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणे आवश्यक आहे.
३) फौजदारी खटले- राज्यघटनेच्या कलम १३४ अन्वये पुढील प्रकारच्या फौजदारी खटल्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते.
१) कनिष्ठ न्यायालयाने एखाद्या आरोपीला निर्दोष ठरवून सोडून दिले असेल,पण उच्च न्यायालयाने त्या निर्णयावर झालेल्या अपिलात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बदलून त्या आरोपीला जर फाशीची शिक्षा सुनावलेली असेल.
२) उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयाकडील एखादा खटला आपल्याकडे चालविण्यास घेऊन त्यात आरोपीला दोषी ठरवून त्यास फाशीची शिक्षा दिली असेल.
३) संबंधित खटला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यायोग्य आहे, असा दाखला उच्च न्यायालयाने दिला असेल.
राज्यघटनेच्या कलम १३६ अन्वये भारतातील कोणत्याही न्यायालयाने न्यायाधीकरणाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय आपल्या विवेकाधिकारात अपील करण्याची खास परवानगी देऊ शकते, परंतु सनिकी न्यायालयाच्या निर्णयाबाबत अशी परवानगी देता येत नाही.
सल्लादायी अधिकार क्षेत्र (Advisory Jurisdiction)- सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात सल्लादायी अधिकार क्षेत्राचाही समावेश होतो. राज्यघटनेच्या कलम १४३ अन्वये सर्वोच्च न्यायालयाचे मत घेण्याइतका सार्वजनिक महत्त्वाचा असा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारताच्या राष्ट्रपतींना वाटते, तर अशा प्रसंगी राष्ट्रपती तो विचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवू शकतात. त्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे मत राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे किंवा नाही यासंबंधी घटनेत उल्लेख नाही, परंतु सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना केवळ सल्ला देत असते हे विचारात घेतले असता असा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही हे स्पष्ट होते. एक महत्त्वाची गोष्ट येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे राष्ट्रपतींनी विचारणा केलेल्या प्रत्येक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिलाच पाहिजे असे त्यावर बंधन नाही. याचा अर्थ असा की, राष्ट्रपतींनी विचारणा केलेल्या एखाद्या प्रश्नावर सल्ला देण्यास / मतप्रदर्शन करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे इतर अधिकार- राज्यघटनेच्या १२९व्या कलमानुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.
२) सर्वोच्च न्यायालय नागरिकांचे स्वातंत्र व मूलभूत हक्क यांचे रक्षण करते.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निवाडे-
गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य- पंजाब राज्यातील गोलकनाथ या व्यक्तीची जमीन त्याच्या मृत्यूनंतर अतिरिक्त जमीन म्हणून घोषित करून पंजाब शासनाने ती ताब्यात घेतली. शासनाची ही नीती कलम १४ व १९ द्वारा पुरविण्यात आलेला मूलभूत अधिकार हिरावून घेतात, असा युक्तिवाद करण्यात आला. स्वाभाविक पहिल्या, चौथ्या व सतराव्या घटनादुरुस्ती कायद्यांना अहवाल देण्यात आले. या खटल्यात न्यायालयाने संसदेच्या केवळ मूलभूत अधिकारांतच दुरुस्ती करण्याचा नव्हे तर घटनेतील कोणताही भाग दुरुस्त करण्याचा अधिकार स्पष्टपणे नाकारला आणि मूलभूत अधिकार अपरिवर्तनीय व पवित्र आहे, असे सांगितले. त्यात न्यायालयाने असे नमूद केले की, कलम ३६८ केवळ घटनादुरुस्तीची पद्धत सांगते, परंतु संसदेस घटनादुरुस्तीचा अधिकार बहाल करत नाही.
एस. आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार (१९९४)- १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा भाजप सरकारवर ठपका ठेवत केंद्रातील नरसिंह राव सरकारने राजस्थान, उत्तर प्रदेश येथील घटक राज्य सरकार बरखास्त केले. बोम्मई खटल्यात कलम ३५६च्या उपाययोजनेत आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नरसिंह राव शासनाची संबंधित राज्यात कलम ३५६ची अंमलबजावणी वैध ठरवली; तथापि त्याबाबत पुढील बाबी नमूद केल्यात १) धर्मनिरपेक्षता हे भारतीय घटनेच्या मौलिक संरचनेचा भाग आहे, त्यामुळे या वैशिष्टय़ांचा भंग करणारी बाब अवैध ठरते. त्याचबरोबर संघराज्यात्मक वैशिष्टय़ हे भारतीय घटनेच्या मौलिक संरचनेचा भाग आहे.
यूपीएससी : सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण (भाग २)
सार्वजनिक उपक्रम समिती (Public undertaking committee)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्वीकार केला. अनेक सार्वजनिक उपक्रमांत मोठी गुंतवणूक करण्यात आली. हे सार्वजनिक उपक्रम कोणत्याही मंत्रालय वा विभागाचा भाग नसल्याने त्यांना अधिक स्वायत्तता होती आणि ते संसदेला जबाबदार नव्हते. जनतेच्या पशातून उभारलेले हे उद्योग राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असले तरी ज्या उद्देशाने या उपक्रमाची स्थापना करण्यात आली त्यासाठी या उपक्रमांवर शासनाचे नियंत्रण आवश्यक होते. म्हणून या उद्देशाने सार्वजनिक उपक्रमांचे प्रशासन व आíथक व्यवहार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्यात आली. या समितीची स्थापना १ मे १९६४ पासून करण्यात आली.
रचना- या समितीमध्ये लोकसभेतील १५ व राज्यसभेतील ७ असे एकूण २२ सदस्य असतात. एकल संक्रमण मतदान पद्धतीने सभागृहातून समितीच्या सदस्यांची निवड केली जाते. यांचा कार्यकाल १ वर्षांचा असतो. लोकसभेतून निवडून गेलेल्या सदस्यांतून सभापती एकाची समितीच्या
अध्यक्षपदी नियुक्ती करतात.
कार्य- या समितीमार्फत संसद सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवते. सर्व उद्योगांचे हिशोब आíथक व्यवहार वार्षकि अहवाल आणि भारताच्या महालेखा परीक्षकांकडून आलेले अहवाल यांचा समिती सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून परीक्षणे नोंदविते. सभागृह व सभापतीने विशेष करून एखादा विषय, प्रकरण समितीकडे सोपविले तरी समिती तिची तपासणी व चिकित्सा करते, ही समिती संपूर्ण वर्षभर काम करते व वर्षांच्या शेवटी आपला अहवाल ती लोकसभेच्या सभापतींना सादर करते. मात्र या समितीला काही मर्यादा आहेत.
सार्वजनिक उपक्रम समितीच्या मर्यादा – सार्वजनिक उपक्रमाच्या व्यापारिक कार्यापेक्षा वेगळ्या अशा शासनाच्या धोरणांची चौकशी समितीला करता येत नाही. २) एखाद्या विशिष्ट सार्वजनिक उपक्रमाच्या कार्याबाबत विशेष कायद्याद्वारे निर्माण केलेल्या यंत्रणेकडे एखादा विषय सोपवला असेल तर त्याची चौकशी करता येत नाही. ३) शासनाचे अधिकतम भागभांडवल असणाऱ्या कंपनींनाही या समितीच्या अधिकार क्षेत्राखाली आणता येत नाही.
भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)
लोकशाही व्यवस्थेत कार्यकारी मंडळावर संसदेचे नियंत्रण असते. कार्यकारी संस्था तो पसा खर्च करत असते. त्यांनी केलेला खर्च संसदेच्या आदेशानुसार आहे की नाही, संसदेने दिलेल्या अनुदानांचा विनियोग जबाबदारीने होतो किंवा नाही हे तपासण्यासाठी संविधानकर्त्यांनी महालेखा परीक्षक हे पद निर्माण केले.
भारतीय संविधानाच्या कलम १४८ नुसार- भारताला एक नियंत्रक व महालेखा परीक्षक असेल आणि त्याची राष्ट्रपतींकडून आपल्या सही-शिक्क्यांनी ही आपल्या अधिकारपत्राद्वारे नियुक्त करण्यात येईल व त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या रीतीने व ज्या कारणास्तव पदावरून दूर करण्यात येते त्याच रीतीने व त्याच कारणास्तव पदावरून दूर करण्यात येईल. २) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून नियुक्त केलेली प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेतील अनुसूची तीनमध्ये दर्शविलेल्या नमुन्याप्रमाणे पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतींसमोर घेईल. ३) त्याचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, संसदेने निर्धारित केलेल्या कायद्यानुसार व अनुसूची दोनमध्ये तरतुदीनुसार निश्चित केले जाते, परंतु नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन वा अनुपस्थिती रजेबाबतचे, निवृत्तिवेतनाबाबतचे, निवृत्तिवयाबाबतचे त्याचे हक्क यामध्ये त्याला व अहितकारक होईल असा बदल त्याच्या निवृत्तीनंतर करता येणार नाही. ४) नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्याची पदधारणा समाप्त झाल्यानंतर तो भारत सरकारच्या नियंत्रणाखालील किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अन्य कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाही. ५) नियंत्रक व महालेखापरीक्षकाच्या कार्यालयात सेवेत असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या बाबतीत प्रदेय असलेले सर्व वेतन, भत्ते व निवृत्तिवेतन यांसह त्यांच्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च हा संचित निधीतून केला जाईल.
कलम १४९ मध्ये नियंत्रक व महालेखा परीक्षकांची कर्तव्ये व अधिकार यांची माहिती देण्यात आली आहे. कलम १५० मधील तरतुदीत ४२व्या घटनादुरुस्तीद्वारा सुधारणा करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीनुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक राष्ट्रपतींच्या सहमतीने अशी सुधारणा करण्यात आली आहे. कलम १५१ नुसार महालेखा परीक्षक आपल्या हिशेबासंबंधी अहवाल राष्ट्रपतींना सादर करतील व राष्ट्रपतींमार्फत संसदेच्या दोन्ही सदनांत तो सादर केला जाईल. त्याचप्रमाणे महालेखापालाने केलेल्या संबंधित राज्याचा अहवाल तो संबंधित राज्याच्या राज्यपालांना सादर करील व राज्यपालांमार्फत संबंधित राज्यांच्या विधिमंडळात सादर केला जाईल, अशी घटनात्मक तरतूद महालेखा परीक्षकांसंबंधित आहे.
कॅगची स्वायत्तता
कॅगची स्वायत्तता भारतीय राज्यघटनेने पुढीलप्रमाणे अबाधित राखली आहे. २) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीप्रमाणे राष्ट्रपती कॅगची नियुक्ती करतात. ३) कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपापासून हे पद मुक्त राहण्यासाठी त्याची बडतर्फी केवळ गरवर्तन किंवा अकार्यक्षमता या आधारावरच होऊ शकते. ४) राज्यघटनेतील कलम १२४ (४) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने बडतर्फ केले जाते तीच पद्धत कॅगसाठी वापरली जाते. ५) कॅगपदाचा किंवा त्याच्या कार्यालयाचा येणारा खर्च भारताच्या संचित निधीतून दिला जातो.