एमपीएससी : भारतीय द्वीपकल्पीय पठार
मागच्या लेखात आपण हिमालय पर्वताच्या रांगांचा अभ्यास केला. आज आपण भारतीय द्वीपकल्पीय पठारे पाहणार आहोत.
भारतीय द्वीपकल्पीय पठार (The Indian Peninsula)- भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा सर्वसाधारण आकार हा अनियमित व त्रिकोणाकृती असून, उत्तर भारतातील महामदानाच्या दक्षिणेपासून कन्याकुमारीपर्यंत ही पठारे पसरलेली आहेत. या पठाराची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे १६०० किमी तर पश्चिम पूर्व रुंदी सुमारे १४०० किमी इतकी आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठाराचे प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे पाडले जातात. १) मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश, २) पूर्वेकडील पठार ३) दख्खनचे पठार, ४) पश्चिम घाट, ५) पूर्वघाट.
१) मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश- मध्यवर्ती उंचवटय़ाच्या प्रदेशात काही पर्वत, टेकडय़ा,पठारे, दऱ्या यांचा समावेश होतो.
अरवली पर्वत- हा भारतातील सर्वात जुना वलित पर्वत आहे. याचा विस्तार दिल्लीपासून उत्तर गुजरातपर्यंत पालमपूपर्यंत पसरलेला आहे. सुरुवातीला अरवली पर्वत उंच होता. आता हवा, पाणी यांचा परिणाम होऊन याचा फार थोडा भाग शिल्लक राहिला आहे. म्हणून याला रिलिक्ट माऊंटन (Relict) असे देखील म्हणतात. अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर गुरू शिखर हे आहे.
पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश- अरवलीच्या पूर्वेला राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश आहे. या प्रदेशाची उंची २८० ते ५०० मी. इतकी आहे. पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाच्या प्रदेशात चंबळ खोऱ्याच्या सखल प्रदेशाचा समावेश होतो. चंबळ नदीचे खोरे म्हणजे भारतामधील अपक्षरण कार्यामुळे होणारी झीज किती प्रमाणात होते याचे एक उदाहरण आहे.
बुंदेलखंड उंचवटय़ाचा प्रदेश- बुंदेलखंड उंचवटय़ाच्या प्रदेशाची उत्तर सरहद्द यमुना नदी तर दक्षिणेस िवध्य पर्वत आहे व यांच्या सीमा वायव्येस चंबळ आणि आग्नेयस पन्ना- अजयगड यांनी निश्चित केलेल्या आहे. हा प्रदेश सपाट तसेच उंच सखल आहे.
माळवा पठार- या पठाराची निर्मिती लाव्हारसापासून झालेली आहे व या पठाराचा बराच भाग काळय़ा मुद्रेचा आढळतो. माळवा पठाराची पश्चिम-पूर्व लांबी ५३० किमी तर उत्तर दक्षिण रुंदी ३९० किमी इतकी आहे.
िवध्य पर्वत- उत्तरेकडे गंगेच्या गाळाचा मदानी प्रदेश, दक्षिणेकडे दख्खनचा पठार या दरम्यान िवध्य श्रेणी आहे. पूर्वेकडे िवध्य पर्वतरांगा भारनेर टेकडय़ांमध्ये विलीन होतात.
छोटय़ा नागपूरचे पठार- भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येकडील भाग हा छोटय़ा नागपूरच्या पठाराने तयार झालेला आहे. छोटय़ा नागपूर पठारात झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेशाचा ईशान्य भाग तसेच पश्चिम बंगालचा पुरोलिया जिल्हा यांचा समावेश होतो. या पठाराचे क्षेत्रफळ ८६२३९ चौ.किमी इतके आहे. या पठारावरून दामोदर सुवर्णरेखा, उत्तर कोयल, दक्षिण कोयल इ. नद्या वाहतात. या प्रदेशांत खनिज संपत्ती मोठय़ा प्रमाणात आढळते म्हणून या पठाराला भारताचे ऱ्हुर (Ruhr of India) असे म्हणतात.
मेघालय पठार- यालाच शिलाँग पठार असे देखील म्हणतात. हे पठार द्वीपकल्पीय पठाराच्या मुख्य भागापासून गारो-राजमहल िखडीमुळे मेघालय पठारापासून वेगळे झाले आहे. मेघालय पठाराचे क्षेत्रफळ सुमारे ३५००० चौ. किमी आहे. या पठाराची पश्चिम सरहद्द बांगलादेशासोबत जोडते. या पठारावर गोरा-खाँसी व मिकीर टेकडय़ा आढळतात.
दख्खनचे पठार- दख्खनच्या पठाराची निर्मिती ही लाव्हारसापासून झालेली आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा हा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आहे. दख्खनच्या पठाराचे- १) उत्तर दख्खनचे पठार व २)दक्षिण दख्खनचे पठार असे दोन उपविभाग केले जातात.
उत्तर दख्खनचे पठार- उत्तर दख्खनच्या पठारात सातपुडा पर्वतरांगा व महाराष्ट्राचे पठार यांचा समावेश होतो.
१) सातपुडा पर्वतरांगा- यामुळे नर्मदा व तापीचे खोरे एकमेकांपासून अलग झालेले आहेत. सातपुडा पर्वतरांगेत धूपगड हे सर्वात उंचीचे शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेचा पश्चिम भाग हा दख्खनच्या पठाराचा असून या पर्वताची रुंदी २० ते ४० किमी इतकी आहे, तर ९०० मी. उंचीपेक्षा जास्त काही शिखरे आहेत. उदा., तोरणमाळ (११५० मी.), अस्तंभा डोंगर (१३२५ मी.) सातपुडा पर्वताच्या पूर्व भागास मकल पठार असे म्हणतात.
२) महाराष्ट्राचे पठार- सहय़ाद्रीच्या पूर्वेकडे मंद उताराचा आणि नद्यांच्या खोऱ्यांचा जो प्रदेश आहे त्याला महाराष्ट्र पठार असे म्हटले जाते. महाराष्ट्र पठारात- १) अजिंठा टेकडय़ा २) गोदावरीचे खोरे
३) अहमदनगर-बालाघाट पठार ४) भीमा-कृष्णा नदीचे खोरे व महादेव डोंगरांचा भाग.
१) अजिंठा टेकडय़ा- तापी आणि गोदावरी नदीत जलविभाजक म्हणून अजिंठा टेकडय़ांचा उल्लेख करावा लागतो. अजिंठा टेकडय़ांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या आहेत.
२) गोदावरी नदीचे खोरे- दख्खनच्या पठारावरील ही सर्वात मोठी नदी आहे. गोदावरीला दक्षिणेची गंगा असे देखील म्हणतात.
३) अहमदनगर-बालाघाट पठार- उत्तरेला गोदावरी व दक्षिणेला कृष्णा नदी यांचे जलविभाजक म्हणून अहमदनगर-बालाघाट काम करते. भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झाला असून त्यांना अनेक उपनद्या येऊन मिळतात.
४) महादेव डोंगररांगांचा उंचवटय़ाचा प्रदेश- महादेव डोंगररांगा या कृष्णा व भीमा नदीच्या जलविभाजक म्हणून काम करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा