मागच्या लेखात आपण भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा अभ्यास केला. आज आपण उत्तर भारतीय मदानी प्रदेश पाहणार आहोत.
उत्तर भारतीय मदानी प्रदेश- हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे. उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मदानी प्रदेश असून पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे. भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० किमी आहे. या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस कि.मी. इतके आहे. हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेले आहे. या मदानात पुढील प्रकारची भूरूपे आढळून येतात. १) भाबर मदान, २) तराई मदान, ३) खादर, ४) भांगर.
१) भाबर मदान- शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे भाबर मदान असून हे मदान दगडगोटय़ांनी तयार झालेले आहे. या ठिकाणी खडय़ांमध्ये असलेल्या सच्छिद्रतेमुळे बरचेसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. यामुळे पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. कृषीसाठी हा प्रदेश अनुकूल नाही.
२) तराई मदान- िहदी भाषेत तर याचा अर्थ ओला असा होता. भाबर पट्टय़ात भूमिगत झालेल्या नद्यांचा प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा वर येतात. यामुळे हा प्रदेश दलदलीचा झाला आहे. या प्रदेशात घनदाट वने तयार झालेली आहेत. भाबर मदानाच्या दक्षिणेकडे १५ ते ३० किमी लांबीचा हा समांतर पट्टा आहे.
३) भांगर मदान- जुन्या गाळामुळे जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला भांगर असे म्हणतात. या मृदेत ह्युमसचे प्रमाण उच्च आहे. सर्वसाधारणपणे भारतीय मदानी प्रदेशातील सर्वात उत्पादित असा हा प्रदेश आहे.
४) खादर मदान- नदी प्रवाहामुळे नवीन गाळाचा जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असे म्हणतात. खादरभूमीत वाळू, मृतिका आणि चिखल आढळतो. खादर मदानातील बरीचशी जमीन लागवडीखाली आलेली आहे. या जमिनीत तांदूळ, गहू, मका, तेलबिया यांची लागवड केली जाते.
    उत्तर भारतीय मदानाची प्रादेशिक विभागणी खालीलप्रकारे केली जाते- राजस्थान मदान, पंजाब-हरयाणा मदान, गंगा मदान, ब्रह्मपुत्रा मदान.
१) राजस्थान मदान- यालाच थरचे वाळवंट असेदेखील म्हणतात. भारतामध्ये थरच्या वाळवंटाचे क्षेत्र सुमारे १.७५ लाख चौ.कि.मी. इतके आहे. या वाळवंटाची विभागणी खालीलप्रकारे करतात. अ) मरुस्थळी   ब) राजस्थान बगर
अ) रुस्थळी- वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळी संबोधतात. यात वाळूच्या टेकडय़ा आढळतात. सर्वसाधारणपणे मरुस्थळीचा पूर्व भाग हा खडकाळ आहे. तर पश्चिम भाग हा वाळूच्या स्थलांतरित टेकडय़ांनी व्यापलेला आहे.
ब) राजस्थान बगर – पूर्वेला अरवली पर्वताच्या कडेपासून पश्चिमेस २५ सेंमी पर्जन्यरेषेदरम्यान राजस्थान बगर विस्तारलेला आहे. बगर हा सपाट पृष्ठभागाचा आहे. अरवली पर्वतातून वाहणारे लहान प्रवाह या बगरमधून वाहतात.
    सांभर सरोवर हे सर्वात मोठे व वैशिष्टय़पूर्ण सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
२)    पंजाब-हरयाणा मदान- पंजाब-हरयाणा मदानाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौ.कि.मी. इतके आहे. यातील पंजाब मदानामधून झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या पाच नद्या वाहतात. दोन नद्यांच्या दरम्यानच्या भूमीला दोआब असे म्हणतात.
३)    गंगा मदान- भारतीय मदानी प्रदेशातील हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. याची पश्चिम पूर्व लांबी १४०० कि.मी. असून याची सरासरी रुंदी ३०० कि.मी. इतकी आहे. गंगा मदानाचे उपविभाजन खालीलप्रकारे केले जाते. ऊध्र्व गंगा मदान, ब) मध्य गंगा मदान, क) निम्न गंगा मदान.
४)    ब्रह्मपुत्रा मदान- या मदानाला आसाम मदान असेदेखील म्हणतात. ब्रह्मपुत्रा मदानाची पूर्व-पश्चिम लांबी ७२० कि.मी. तर उत्तर दक्षिण लांबी जवळजवळ १०० कि.मी. इतकी आहे. भारतीय महामदानाच्या पूर्वेकडील भाग ब्रह्मपुत्रा मदान म्हणून ओळखला जातो. हे मदान ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेले आहे.
    ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या- ही जगातील मोठय़ा नद्यांपकी एक नदी असून ती तिबेटमधून दक्षिणेकडे आसाममधून बांगलादेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली हे बेट आहे.

यूपीएससी : आकलन (Comprehesion) भाग-१
आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून त्यावर योग्य निर्णय घेणे. आकलन या घटकावर, उताऱ्यांवर आधारित ५ ते ६ प्रश्न दिलेले असतात. आकलन या घटकांवर दोन प्रकारचे उतारे असतात. १) आकलन (Comprehesion) २) इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English Language Comprehesion), इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य यासाठी जो उतारा दिलेला असतो तो फक्त इंग्रजीत असतो. त्याचे भाषांतरण केलेले नसते. हे उतारे सरळ व सोपे असतात.
परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.
१)    परीक्षा कक्षात प्रचंड मानसिक ताण असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा घाईघाईत माहिती असलेल्या गोष्टींतदेखील चुका होतात. सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे. लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत. इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
२)    उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा. उतारा असा वाचावा की तो पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही.
३)    उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावे. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
४)    सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत? की प्रश्न वाचून उतारा सोडवावा? याबाबत मतमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, मात्र प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला काय माहिती उताऱ्यातून जाणून घ्यावयाची आहे हे समजते व आपला वेळ वाचतो तसेच प्रश्न वाचून घेतल्याने उतारा समजणे जास्त सोपे जाते. उतारा वाचताना तो शब्द न् शब्द न वाचता उताऱ्यातील महत्त्वाच्या वाक्यांवर नजर फिरवल्यास, आपल्या वाचण्याचा वेग वाढतो.
सरावासाठी काही उतारे खालीलप्रमाणे-
Nationalism, of course, is a curious phenomenon which at a certain stage in a country’s history gives life, growth and unity but, at the same time, it has a tendency to limit one, because one thinks of one’s country as something different from the rest of world. One’s perceptive changes and one is continuously thinking of one’s own struggles and virtues and failing to the exclusion of other thoughts. The result is that the same nationalism which is the symbol of growth for a people becomes a symbol of the cessation of that growth in mind. Nationalism, when it becomes successful sometimes goes on spreading in an aggressive way and becomes a danger internationally. Whatever line of thought you follow, you arrive at the conclusion that some kind of balance must be found. Otherwise something that was good can turn into evil. Culture, which is essentially good become not only static but aggressive and something that breeds conflict and hatred when looked at from a wrong point of view. How are you find a balance, I don’t know. Apart from the political and economic problems of the age, perhaps, that is the greatest problem today because behind it there is tremendous search for something which it cannot found. We turn to economic theories because they have an undoubted importance. It is folly to talk of culture or even of god. When human beings starve and die. Before one can talk about anything else one must provide the normal essentials of life to human beings. That is where economies comes in. Human beings today are not in mood to tolerate this suffering and starvation and inequality when they see that the burden is not equally shared. Others profit while they only bear the burden.
Answers are in bold.
1.    The greatest problem in the middle of the passage refers to the question
    1.    how to mitigate hardship to human beings
    2.    how to contain the dangers of aggressive nationalism.
    3.    how to share the economic burden equally
    4.    how to curb international hatred
2.    Negative national feeling can make a nation
    1.    selfish    2.    self-centred
    3.    indifferent    4.    dangerous
3.    Suitable title for this passage can be
    1.    Nationalism breeds unity
    2.    Nationalism – a road to world unity
    3.    Nationalism is not enough
    4.    Nationalism and national problems
4.    ‘Others’ in the last sentence refers to
    1.    other people    2.    other nations
    3.    other communities    4.    other neighbours
5.    Aggressive nationalism
    1.    breeds threat to international relations
    2.    leads to stunted growth
    3.    endangers national unity
    4.    isolates a country

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Story img Loader