मागच्या लेखात आपण भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा अभ्यास केला. आज आपण उत्तर भारतीय मदानी प्रदेश पाहणार आहोत.
उत्तर भारतीय मदानी प्रदेश- हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे. उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मदानी प्रदेश असून पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे. भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० किमी आहे. या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस कि.मी. इतके आहे. हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेले आहे. या मदानात पुढील प्रकारची भूरूपे आढळून येतात. १) भाबर मदान, २) तराई मदान, ३) खादर, ४) भांगर.
१) भाबर मदान- शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे भाबर मदान असून हे मदान दगडगोटय़ांनी तयार झालेले आहे. या ठिकाणी खडय़ांमध्ये असलेल्या सच्छिद्रतेमुळे बरचेसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. यामुळे पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. कृषीसाठी हा प्रदेश अनुकूल नाही.
२) तराई मदान- िहदी भाषेत तर याचा अर्थ ओला असा होता. भाबर पट्टय़ात भूमिगत झालेल्या नद्यांचा प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा वर येतात. यामुळे हा प्रदेश दलदलीचा झाला आहे. या प्रदेशात घनदाट वने तयार झालेली आहेत. भाबर मदानाच्या दक्षिणेकडे १५ ते ३० किमी लांबीचा हा समांतर पट्टा आहे.
३) भांगर मदान- जुन्या गाळामुळे जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला भांगर असे म्हणतात. या मृदेत ह्युमसचे प्रमाण उच्च आहे. सर्वसाधारणपणे भारतीय मदानी प्रदेशातील सर्वात उत्पादित असा हा प्रदेश आहे.
४) खादर मदान- नदी प्रवाहामुळे नवीन गाळाचा जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असे म्हणतात. खादरभूमीत वाळू, मृतिका आणि चिखल आढळतो. खादर मदानातील बरीचशी जमीन लागवडीखाली आलेली आहे. या जमिनीत तांदूळ, गहू, मका, तेलबिया यांची लागवड केली जाते.
उत्तर भारतीय मदानाची प्रादेशिक विभागणी खालीलप्रकारे केली जाते- राजस्थान मदान, पंजाब-हरयाणा मदान, गंगा मदान, ब्रह्मपुत्रा मदान.
१) राजस्थान मदान- यालाच थरचे वाळवंट असेदेखील म्हणतात. भारतामध्ये थरच्या वाळवंटाचे क्षेत्र सुमारे १.७५ लाख चौ.कि.मी. इतके आहे. या वाळवंटाची विभागणी खालीलप्रकारे करतात. अ) मरुस्थळी ब) राजस्थान बगर
अ) रुस्थळी- वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळी संबोधतात. यात वाळूच्या टेकडय़ा आढळतात. सर्वसाधारणपणे मरुस्थळीचा पूर्व भाग हा खडकाळ आहे. तर पश्चिम भाग हा वाळूच्या स्थलांतरित टेकडय़ांनी व्यापलेला आहे.
ब) राजस्थान बगर – पूर्वेला अरवली पर्वताच्या कडेपासून पश्चिमेस २५ सेंमी पर्जन्यरेषेदरम्यान राजस्थान बगर विस्तारलेला आहे. बगर हा सपाट पृष्ठभागाचा आहे. अरवली पर्वतातून वाहणारे लहान प्रवाह या बगरमधून वाहतात.
सांभर सरोवर हे सर्वात मोठे व वैशिष्टय़पूर्ण सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
२) पंजाब-हरयाणा मदान- पंजाब-हरयाणा मदानाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौ.कि.मी. इतके आहे. यातील पंजाब मदानामधून झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या पाच नद्या वाहतात. दोन नद्यांच्या दरम्यानच्या भूमीला दोआब असे म्हणतात.
३) गंगा मदान- भारतीय मदानी प्रदेशातील हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. याची पश्चिम पूर्व लांबी १४०० कि.मी. असून याची सरासरी रुंदी ३०० कि.मी. इतकी आहे. गंगा मदानाचे उपविभाजन खालीलप्रकारे केले जाते. ऊध्र्व गंगा मदान, ब) मध्य गंगा मदान, क) निम्न गंगा मदान.
४) ब्रह्मपुत्रा मदान- या मदानाला आसाम मदान असेदेखील म्हणतात. ब्रह्मपुत्रा मदानाची पूर्व-पश्चिम लांबी ७२० कि.मी. तर उत्तर दक्षिण लांबी जवळजवळ १०० कि.मी. इतकी आहे. भारतीय महामदानाच्या पूर्वेकडील भाग ब्रह्मपुत्रा मदान म्हणून ओळखला जातो. हे मदान ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेले आहे.
ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या- ही जगातील मोठय़ा नद्यांपकी एक नदी असून ती तिबेटमधून दक्षिणेकडे आसाममधून बांगलादेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली हे बेट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा