रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचे मौद्रिक / द्रव्यविषयक धोरण तिच्यामार्फत राबविले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आला- दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया असे नाव द्यावे ही शिफारस केली.
८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयी विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली, त्यामुळे हे विधेयक RBI Act १९३४ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी RBIची स्थापना झाली. RBI ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये. RBI च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी, इ. कारणांसाठी RBI चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१ जानेवारी १९४९ पासून RBI चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी RBI (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) कायदा, १९४८ संमत करण्यात आला. RBI च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.
RBI चे चलनविषयक धोरण (Monetary Policy of the RBI)
भारतीय रिझव्र्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, त्यामुळे विविध काय्रे करावी लागतात. त्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे.
१) पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने-
या संख्यात्मक साधनांचा परिणाम प्रत्यक्ष चलनाच्या / पतपशाच्या संख्येवर किंवा प्रमाणावर होत असतो. या साधनांच्या वापरामुळे बँकेकडील व पर्यायी देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोख रकमेची वाढ/घट होते. परिणामत: एकूण पतचलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते.
संख्यात्मक साधनांत १) बँक दर धोरण २) रोख राखीव प्रमाण ३) वैधानिक रोखता प्रमाण (S.L.R) ४) खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार (OMO) ५) रेपो व रिव्हर्स रेपो
१) बँक दर धोरण-
RBI कायदा १९३४च्या कलम ३९ नुसार बँक दर म्हणजे असा प्रमाण दर की ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या हुंडय़ा/ इतर चलनक्षम दस्तऐवज विनिमयपत्रे व इतर व्यापारी विपत्रांचे पुनर्वटावचा दर.
थोडक्यात RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करते त्यास बँक दर असे म्हणतात.
जर RBI ने बँक दरात वाढ केली तर बँकांनादेखील आपल्या व्याजदरात वाढ करावी लागते म्हणून उद्योग व्यवसायासाठी दिले जाणारे कर्ज महाग होते म्हणून ते कमी कर्ज घेतात, त्यामुळे त्यांची गुंतवणूकदेखील कमी होते. परिणामत: आíथक व्यवहार कमी होतात म्हणून अर्थव्यवस्थेतील पसा कमी होतो. किमती घटू लागतात. अशा रीतीने पतचलन संकोच घडून येतो. तेजीच्या परिस्थितीत म्हणजे चलनवाढीच्या किंवा किंमतवाढीच्या काळात हे धोरण राबविले जाते, यालाच महाग पशाचे धोरण (डिअर) RBI जर अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पशाची निर्मिती झाली असेल तर महाग पशाच्या धोरणाचा अवलंब करून पतचलन संकोच घडवून आणते. याउलट RBI ने बँक दर कमी केल्यास व्यापारी बँकादेखील आपला व्याजदर कमी करतात. कर्ज स्वस्त झाल्याने उद्योजक- व्यावसायिकांची गुंतवणूकवाढते. त्यामुळे किमतीत वाढ होते आणि पशाची मागणी होऊन पतचलन विस्तार होतो. बँक दर कमी करण्याच्या धोरणाला स्वस्त पशाचे धोरण म्हणतात. मंदीच्या परिस्थितीत हे धोरण राबविले जाते. स्वस्त पशाच्या धोरणाचा अवलंब करून पतचलन विस्तार घडवून आणला जातो.
२) रोख राखीव प्रमाण (C.R.R )-
RBI कायदा १९३४च्या सेक्शन ४२ (आय) नुसार सर्व व्यापारी बँकांवर सी.आर.आर.चे बंधन टाकण्यात आले आहे. सेक्शन १८ नुसार बिगर अनुसूची बँका सी.आर.आर.चा निधी स्वत:कडे ठेवू शकतात.
प्रत्येक व्यापारी बँकेला स्वत:जवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपकी (मागणी ठेवी व मुदत ठेवी) काही प्रमाणात ठेवी RBI कडे रोख प्रमाणात ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला (सी.आर.आर.) असे म्हणतात.
RBI ने सी.आर.आर. वाढविल्यास बँकांना जास्त निधी RBI कडे ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडे कर्ज देण्याजोगी रक्कम कमी झाल्याने त्यांची पतनिर्मितीची क्षमता कमी होते त्यामुळे पतसंकोच घडून येतो. याउलट RBI ने सी.आर.आर. कमी केल्यास बँकांकडील कर्ज देण्याजोगी रक्कम वाढल्याने त्यांची पतनिर्मितीची क्षमता वाढते, त्यामुळे पतविस्तार घडून येतो.
३) वैधानिक रोखता प्रमाण (एस.एल.आर.)- सर्व बँकांवर (एस.एल.आर) बंधन बँकिंग नियमन कायदा १९४९च्या सेक्शन २४ नुसार टाकण्यात आलेल्या आहेत.
प्रत्येक व्यापारी बँकेला स्वत:जवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपकी (मागणी ठेवी व मुदत ठेवी) काही प्रमाणात ठेवी स्वत:कडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवाव्या लागतात.
जर बँकांनी सर्व ठेवी कर्जरूपाने वाटून टाकल्या, तर बँकेची पत धोक्यात येऊन बँक बुडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, म्हणून सर्व बँकांवर एस.एल.आर.चे बंधन टाकण्यात आले आहे. बँकांना एस.एल.आर.च्या ठेवी कर्ज देण्यासाठी वापरता येत नाही. RBI ने एस.एल.आर. वाढवल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम कमी होऊन पतसंकोच घडून येतो. RBI ने एस.एल.आर. कमी केल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम वाढून पतविस्तार घडून येतो.
यूपीएससी – भूगोल (हवामान)
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे –
१)विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low – Pressure Belt)- विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस ५ अंश उत्तर ते ५ अंश दक्षिण अक्षाच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. या अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात. त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो. कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते. या पट्टय़ात बराच काळ हवा ही शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून त्याला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा DOLDRUM असे म्हणतात.
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्र येतात. त्यास आंतर-उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ) असे म्हणतात.
२) उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High – Pressure Belt)- दोन्ही गोलार्धात २५अंश ते ३५अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते. तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते. नंतर ही हवा २५ अंश ते ३०अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
अंश अक्षांश (Horse Latitude)- कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या २५अंश ते ३०अंश उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ात हवा ही शांत असते, म्हणून या पट्टय़ाला अंश अक्षांश असे म्हणतात.
३) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे (Subpolar Low- Pressure Belt) – ५० अंश ते ६० अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तेथील हवा ऊध्र्व दिशेला लोटली जात असल्याने तेथे कमीचा पट्टा निर्माण होतो. दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धाच्या मानाने पाणी जास्त असल्याने उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात हा कमी वायुभाराचा प्रदेश अधिक स्थिर स्वरूपाचा असतो.
४) ध्रुवीय अधिक दाबाचा पट्टा ( polar High – Pressure Belt)-
हे पट्टे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात पसरलेले असतात. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्याने तेथे अधिक दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.
वारे – हे प्रामुख्याने जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे स्थितिसमांतर दिशेने वाहतात.
१) ग्रहीय वारे – पृथ्वी या ग्रहाच्या प्रदेशात हे वारे नियमितपणे वाहतात म्हणून यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. त्यांचे वर्गीकरण पुढील प्रकारांत करतात.
अ) व्यापारी वारे, ब) प्रतिव्यापारी वारे, क) ध्रुवीय वारे
अ) व्यापारी वारे- उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५अंश ते ३५अंश अक्षवृत्त) कडून विषवृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे ५अंश उत्तर ते ५अंश दक्षिण जे वारे वाहतात त्यांना व्यापारी वारे असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे सरळ विषवृत्ताकडे वाहत येत नाहीत. उत्तर गोलार्धात ते स्वत:च्या उजव्या बाजूस, तर दक्षिण गोलार्धातील ते स्वत:च्या डाव्या बाजूस वळल्याने त्यांची दिशा बदलते. ते सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना पूर्वीय वारे ( Easterlies ) असे म्हणतात. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्यकडून नर्ऋत्येकडे वाहतात. तर दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायव्येकडे वाहतात. हिवाळय़ात हे वारे अधिक नियमित व जोरदार असतात. उन्हाळय़ात इतरत्र निर्माण होणाऱ्या भार प्रदेशामुळे हे वारे थोडे कमकुवत होतात.
ब) प्रतिव्यापारी वारे / पश्चिमी वारे- उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५ ते ३५ अंशवृत्ताच्या दरम्यान) उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६० अक्षवृत्त) या दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात. त्यामुळे प्रतिव्यापारी वारे साधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात म्हणून त्यांना पश्चिमी वारे असेदेखील म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असल्याने वर्षभर खंडाच्या पश्चिम भागात पाऊस पडतो. कधी हे वारे मंद तर कधी वादळी स्वरूपात असतात. दक्षिण गोलार्धात जास्त जलभार असल्याने प्रतिव्यापारी वारे हे नियमित वाहतात.
दक्षिण गोलार्धात ४० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा फारसा अडथळा नसल्याने हे वारे वेगाने वाहतात व ते विशिष्ट आवाजाची निर्मिती करतात म्हणून त्यांना गर्जणारे ४० असे म्हणतात. तर ५० अंश दक्षिण पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने वाऱ्यांना कोणताही अडथळा राहत नाही. या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो ते उग्र स्वरूप धारण करतात म्हणून त्यांना खवळलेले ५० वारे (Frious fifty) असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांमुळे पश्चिम कॅनडा पश्चिम युरोप या देशांत वर्षभर नियमित पाऊस पडतो.
क) ध्रुवीय वारे-
ध्रुवाजवळील जास्त दाबाच्या पट्टय़ाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६० अक्षवृत्त) याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे हे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, त्यांना ( Pollar Easterlies) असे म्हणतात.