व्हच्र्युअल रिएॅलिटी ( आभासी सत्य ) : प्रत्यक्ष असावे तसेच पण संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो.
टेलिमेडिसीन : संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव – वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडीसीन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार, रूग्णाचा वैद्यकीय अहवाल विशेषज्ञ डॉक्टरांकडे पाठविला जातो. विशेषज्ञ डॉक्टर हा अहवाल अभ्यासून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने रूग्णावर योग्य उपचार करतात. ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सुविधांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी टेलिमेडीसीन हा एक प्रभावी मार्ग आहे.
इंटरनेट प्रोटोकॉल टेलीव्हिजन : IPTV ही परपस्पर संपर्काची सुविधा असलेली डिजिटल टेलीव्हिजन सेवा असून यामध्ये केवळ टेलीव्हिजन या पारंपरिक प्रसारणाखेरीज इंटरनेटद्वारेही प्रक्षेपण करण्यात येते. या सेवेमुळे ग्राहकांना मागणीनुसार चित्रफीत ही सुविधा देखील उपलब्ध होते.
संगणकाचा उपयोग
१) नेटवर्किंग : दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगणक एकत्र जोडणा-या संदेशवहन प्रणालीला संगणक नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्किंगमुळे हवी ती माहिती कोणत्याही संगणकावर मिळू शकते. यामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो. एखादया संस्थेसाठी किंवा विभागासाठी केलेल्या नेटवर्किंगला इंट्रानेट असे म्हणतात. याउलट, जगातील संगणक एकमेकांना ज्या नेटवर्कने जोडलेले असतात त्यास इंटरनेट असे म्हणतात.
नेटवर्कचे प्रकार :
अ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) : एका इमारतीतील कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क हे ‘लॅन’ या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. लॅनची मालकी खाजगी असते. अनेक व्यक्ती एकाच वेळेस माहितीवर प्रक्रिया करू शकतात. व्यक्तिगत संगणकाचा पर्याप्त वापर तसेच मध्यवर्ती केंद्रीय संगणक अनावश्यक, ही लॅन ची वैशिष्टये सांगता येतील.
ब) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (MAN) : संपूर्ण शहर व्यापून टाकणारे असे हे नेटवर्क असते. यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो.
क)वाइड एरिया नेटवर्क (WAN): जेव्हा भौगोलिकदृष्टय़ा विविध ठिकाणी असलेले संगणक नेटवर्कमध्ये जोडले जातात, तेव्हा त्यास वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात. यासाठी टेलिफोन लाइन, दूरसंचार उपग्रह व मायक्रोवेव्ह लिंक्सचा उपयोग केला जातो.
ड) क्लाऊड कॉम्प्युटिंग : क्लाऊड कॉम्प्युटिंग ही लॅन व वॅन यांच्या पुढची पायरी आहे. जेव्हा मोठा समूह माहितीची प्रचंड प्रमाणात देवाण – घेवाण करतो, तेव्हा नेटवर्कचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. या समस्येवर मात करण्यासाठीच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उदय झाला. यामध्ये वेगवेगळया प्रणालींना एकाच वेळी कामाला लावले जाते. एक माहितीची साठवणूक करतो तर दुसरा या माहितीच्या साठय़ावर प्रक्रिया करतो, तिसरा या प्रक्रियायुक्त माहितीचा परिणामकारक वापर करण्यासाठी नेटवर्क तयार करतो अणि चौथा या नेटवर्कची सेवा ग्राहकांना उपलब्ध करन देतो.
२) बहुविध प्रसारमाध्यमे : मल्टिमीडिया हे सर्व प्रकारच्या माध्यमांच्या एकत्रीकरणाचे एक प्रभावी सादरीकरण असून यात व्हिडिओ दृश्य,संगीत, आवाज, चित्रलेख आणि मजकूर इ. चा समावेश होतो. याचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे यात उपयोगकर्त्यांचा सहभाग किंवा परस्परसंपर्क असतो. या माध्यमाद्वारे माहितीचे संस्करण, संकलन आणि जतन करता येते. या माध्यमात माहितीवर विविध प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया करतांना दृक-श्राव्य तंत्राचा वापर करता येतो. उपयोग : करमणूक क्षेत्रात एॅनिमेशन, स्पेशल इफेक्टस, व्हिडिओ गेम्स् इ.मध्ये याचा वापर होतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करिता, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, प्रशिक्षण,कोशनिर्मिती, माहितीपत्रके, संदर्भग्रंथ इ. साठी, वेब तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाहिरात, विक्री, शेअर बाजार इ. माहिती होण्यासाठी.
३) इंटरनेट : इंटरनेट म्हणजे संगणकीय जाळयांचे जाळे. यामध्ये वेगवेगळे सव्र्हर व ग्राहक एकमेकांशी दूरध्वनी तसेच उपग्रह यामार्फत जोडलेले असतात. या जाळयातील कोणत्याही दोन संगणकांमध्ये माहितीचे संप्रेषण होऊ शकते.
४) वेब तंत्रज्ञान : इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील प्रथम अवस्थेस वेब १.० तंत्रज्ञान म्हणुन ओळखले जाते. एकापेक्षा अनेक ब्राउझर्सची उपलब्धता, विविध सर्च इंजिन्सची उपलब्धता, विविध संकेतस्थळे व पोर्टल्सची उपलब्धता, इ-स्वरूपातील संकेतस्थळे ही याची वैशिष्टये सांगता येतील. वेब १.० तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे वेब २.० हे तंत्रज्ञान होय. हे इंटरनेटवर आधारित सेवांची प्रगत पिढी असून यामध्ये खालील तंत्रज्ञानांच्या समूहांचा समावेश होतो.
१) वैयक्तिक लेखांसाठी ब्लॉग : या माध्यमातून अनेक व्यक्ती एकमेकांशी वैचारिक संबंध प्रस्थापित करन विचारांची देवाण – घेवाण करतात.
२) रिच साइट समरी किंवा रिअली सिम्पल सिंडिकेशन : या माध्यमातून वाचकांच्या गरजेशी निगडित माहिती स्वयंचलित पध्दतीने एकत्र
केली जाते. यामुळे विविध विषयांची नवीन माहिती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळया संकेतस्थळांचा वापर करण्याची गरज नसते.
३) विकीज: वेब पानांचा संग्रह म्हणजेच विकीज. यामधील माहिती मार्कअप् लॅग्वेजचा उपयोग करून संपादित करता येते.
४) इ-प्रशासन : संगणकीय प्रणाली व इंटरनेटचा प्रभावी वापर करून प्रशासनात सुसूत्रता व शीघ्रता आणण्याची प्रक्रिया म्हणजे इ- प्रशासन होय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा