इतिहास विषयात पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आर्किऑलॉजी, म्युझिऑलॉजी, डॉक्युमेन्टेशन, हेरिटेज मॅनेजमेन्ट आदी विविध विषयांत उच्च शिक्षण मिळवता येते आणि या क्षेत्रांत करिअरच्या संधीही प्राप्त होऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. केंद्र- राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयांमध्ये त्यांना संधी मिळू शकते. ऐतिहासिक वास्तूंची देखभाल, संवर्धन याची जबाबदारी प्रामुख्याने इतिहास विषयात रस असलेल्या आणि या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना मिळू शकते.
आíकऑलॉजी विषयाच्या एमए पदवीधारकांना आíकऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये करिअर करता येऊ शकते.  अशा संस्थांमध्ये क्युरेटर, प्रकल्प व्यवस्थापक आणि संशोधक साहाय्यक म्हणून करिअरची संधी मिळू शकते.
एम.ए., एम.फिल अथवा पीएच.डी. केल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, खासगी महाविद्यालये यामध्ये अध्यापनाची तसेच संशोधनाची संधी उपलब्ध होऊ शकते. काही स्वयंसेवी संस्थासुद्धा अशा उमेदवारांना संधी देत असतात.
ऐतिहासिक वारसा/ वास्तू आदींबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांची तड लावण्यासाठी इतिहास आणि विधी या विषयांमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी असल्यास लॉ फम्र्समध्ये संधी मिळू शकते. खासगी प्रॅक्टिससुद्धा करता येऊ शकते. इतिहास आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक म्हणून संधी मिळू शकते. इतिहास आणि सामाजिक कार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संशोधन संस्था, संशोधन साहाय्यक वा संशोधन प्रकल्पाचे संचालक वा समन्वयक, खासगी उद्योगांमधील कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी घटकांमध्ये संधी मिळू शकते.
इतिहासासोबत मास कम्युनिकेशन वा जर्नालिझम या विषयामध्ये पदवी घेतल्यास माध्यमांच्या क्षेत्रातही अनेक संधी मिळू शकतात.
मूलभूत ऐतिहासिक लिखाण करणाऱ्यांची बरीच वानवा सध्या दिसून येते. त्यामुळे हे क्षेत्रही करिअर करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.
केंद्र आणि राज्य शासनामार्फत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये इतिहास विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. शिवाय मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्येही काही वर्णनात्मक प्रश्न विचारले जातात. इतिहासाच्या वाचनाने विविध प्रश्नांकडे आणि समस्यांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. इतर प्रश्न सोडवताना अशा व्यापक विचारसणीचा उपयोग उत्तरांचा दर्जा आणि वस्तुनिष्ठता वाढवण्यासाठी होतो. इतिहासविषयक ग्रंथ आणि पुस्तके मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने अभ्यासासाठी दर्जेदार साहित्य प्राप्त करण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागत नाही.
इतिहास विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटकांचे गाइड होण्याची संधी मिळू शकते. इतिहासाच्या खाचाखोचा अचूक, वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि प्रभावीरीत्या सांगू शकणाऱ्या, विविध ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करू शकणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात चांगली मागणी मिळू शकते.
*    आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया :
केंद्र सरकारच्या ऑíकऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया या संस्थेने इन्स्टिटय़ूट ऑफ ऑíकऑलॉजी या संस्थेची स्थापना केली आहे. पुरातत्त्वशास्त्र, नाणेशास्त्र, संवर्धन, वस्तुसंग्रहालय, वास्तुलेखन, प्राचीन वस्तू संशोधन कायदे यांसारख्या बहुशाखीय अभ्यासक्रमांसाठी आणि संशोधनासाठी ही संस्था शिक्षण-प्रशिक्षण देते आणि संशोधनकार्याला प्रोत्साहन देते. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आíकऑलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी. कालावधी- दोन वर्षे. पत्ता- जनपथ, नवी दिल्ली- ११००११.
वेबसाइट- asi.nic.in ईमेल- dirins.asi@gmail.com
*    पुरातन इतिहास आणि संस्कृती :
बारावीनंतर कलाशाखेत प्रवेश घेऊन इतिहास विषयात बीए किंवा बीए ऑनर्स करता येते. त्यानंतर एमए इन हिस्ट्री अथवा एम ए इन एन्शन्ट हिस्ट्री अ‍ॅण्ड कल्चर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये हा विषय शिकवला जातो.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सटिीच्या सेंटर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेत एम.ए., एम. फिल आणि पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळ- http://www.jnu.ac.in
*    इतर काही महत्त्वाचे अभ्यासक्रम :
*    इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्ट्री, कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड म्युझिऑलाजी, नॅशनल म्युझियम जनपथ, नवी दिल्ली- ११००११- या संस्थेत एम.ए. इन म्युझिऑलॉजी आणि याच विषयात पीएच.डी. करण्याची सोय आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मानव्यशास्त्र शाखेतील कोणत्याही विषयातील
५० टक्के गुणांसह बी.ए. व एम.ए. करणे आवश्यक आहे.
    या संस्थेने एम.ए. इन कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड रिस्टोरेशन वर्क ऑफ आर्ट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या विषयांसह ५० टक्के गुणांसह बी. एस्सी.
    डिप्लोमा इन म्युझियम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, म्युझियम मॉडेिलग अ‍ॅण्ड फोटोग्राफी. हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- एम.ए. इन हिस्ट्री/ म्युझिऑलॉजी.
*    स्कूल ऑफ अर्कायव्हल स्टडीज (जनपथ, नवी दिल्ली- ११००११)- या संस्थेने एक वर्ष कालावधीचा  डिप्लोमा कोर्स इन अर्कायव्हल स्टडीज हा अभ्यासक्रम
सुरू केला आहे.
*    गांधीग्राम रुरल इन्स्टिटय़ूट- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्काइव्ह अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
*    उस्मानिया युनिव्‍‌र्हसिटी, हैदराबाद- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्कायव्हल सायन्स अ‍ॅण्ड मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी
हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- इतिहास
विषयात बी.ए.
*    बनारस िहदू विद्यापीठ, वाराणसी- या संस्थेने डिप्लोमा इन म्युझिओलॉजी आणि एम.ए. इन म्युझिओलॉजी
हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अर्हता- इतिहास
विषयात बी.ए.
*    दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ हेरिटेज रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट  नवी दिल्ली- या संस्थेने मास्टर ऑफ ऑíकऑलॉजी अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ कॉन्झर्वेशन,
प्रीझर्वेशन अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू
केले आहेत. इतिहास विषय घेऊन बी.ए. केलेल्या
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

नया है यह!
मास्टर ऑफ सायन्स इन एन्व्हायरॉन्मेन्ट मॅनेजमेंट-
हा अभ्यासक्रम फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, देहराडूनने सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विज्ञानशाखेतील पदवी किंवा बी. एस्सी. इन फॉरेस्टरी किंवा अ‍ॅग्रिकल्चर किंवा बी.ई. किंवा बी.टेक् (एन्व्हायरॉन्मेन्टल सायन्स). पत्ता- रजिस्ट्रार, एफआरआय- डीम्ड युनिव्हर्सटिी, देहराडून- २४८१९५. वेबसाइट-  fri.icfre.ac.in
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha 1 may