स्थापत्य अभियांत्रिकीला (सिव्हील इंजिनीयरिग) आलेले महत्त्व लक्षात घेता या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील काही वेगळ्या अभ्यासक्रमांची ओळख-
देशात ‘मेड इन इंडिया’ आणि राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ यांचे वारे वाहत आहेत. त्याअनुषंगाने विविध प्रकल्प मोठय़ा प्रमाणात राबवले जाणार आहेत. ‘स्मार्ट’ शहरांची उभारणी केली जाणार आहे. नवे महामार्ग, उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. दररोज किमान २० किलोमीटरचे राष्ट्रीय स्तरावरील रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे. परवडणाऱ्या घरांच्या बांधकामालाही देशात आणि राज्यात गती दिली जाणार आहे. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देणारी विविध प्रकारची धोरणे आखली जात आहेत. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामध्ये स्थापत्य अभियंत्यांची संख्या सर्वाधिक असू शकते. कोणत्याही उत्तम बांधकामात स्थापत्य अभियंत्यांचे तंत्र-कौशल्य पणाला लागत असते. या अभियंत्यांनी जगभरातील विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांना आकार दिला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या बांधकाम आणि पाटबंधारे विभागात सातत्याने स्थापत्य अभियंत्यांची भरती केली जाते. राज्य सरकारच्या या विभागांसाठी अभियंत्यांची निवड राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. या परीक्षेद्वारे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदांसाठी नियुक्ती केली जाते. यातील काही अभियंत्यांना गुणवत्तेवर सचिव पदापर्यंत पदोन्नती मिळू शकते.
मोठय़ा गृहनिर्माण कंपन्यांनामध्येही स्थापत्य अभियंत्यांना मोठय़ा प्रमाणावर संधी मिळू शकते. शिवाय स्वत:चा व्यवसाय उभारता येतो.
स्थापत्य अभियांत्रिकी हा विषय सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या शाखेत प्रवेश मिळू शकतो. मात्र, केवळ भविष्यकालीन संधी आहेत, या एका निकषावर स्थापत्य शाखेत प्रवेश घ्यावा असे नाही. विद्यार्थ्यांने स्वत:ला या क्षेत्राची आवड आहे किंवा नाही हे वस्तुनिष्ठपणे लक्षात घ्यायला हवे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे संगणकीय रेखांकन करण्यासोबत सृजनशील क्षमता असणे गरजेचे आहे. याचे कारण घरबांधणी वा इतर पायाभूत प्रकल्पांची उभारणी हे केवळ यांत्रिकपणे करायचे काम नाही. ही एक कला आहे. उपयुक्तता आणि कलात्मकता यांचा मेळ साधण्याचे कौशल्य या अभियंत्यांना पार पाडावे लागते.
काही वेगळे अभ्यासक्रम- या क्षेत्रातील करिअरचा आलेख उंचावण्यासाठी पुढील काही अभ्यासक्रम
उपयुक्त ठरतात-
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट : हा अभ्यासक्रम सीएमसी लिमिटेड या संस्थेने सुरू केला आहे. टाटा कन्सल्टन्सी कंपनीच्या अंतर्गत सीएमसी लिमिटेड ही संस्था कार्यरत आहे. अर्हता- ५० टक्के गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी. पत्ता- सीएमसी लिमिटेड, एसकेसीएल सेन्ट्रल स्क्वेअर- १, तिसरा मजला, सिपेट रोड, थिरु- वी- का इंडस्ट्रिअल इस्टेट, िगडी, चेन्नई- ३२.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च: बांधकाम व्यवसायाच्या व्यवस्थापन शाखेची बाजू सक्षम करण्यासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या संस्थेने कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट विषयक विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संस्थेला पायाभूत सुविधा आणि बांधकाम उद्योगाकडून सहकार्य प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ही मान्यता प्रदान केली आहे. संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन अॅडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम संस्थेच्या पुणे, हैदराबाद, गोवा आणि इंदूर या कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीयिरग किंवा आíकटेक्चर किंवा प्लॅिनग.
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन प्रोजेक्ट इंजिनीयिरग अॅण्ड मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम संस्थेच्या पुणे कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीयिरग.
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन रियल इस्टेट अॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम संस्थेच्या पुणे कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीयिरग किंवा आíकटेक्चर किंवा प्लॅिनग.
= पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, डेव्हलपमेंट अॅण्ड मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम संस्थेच्या पुणे कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीयिरग किंवा आíकटेक्चर किंवा प्लॅिनग. या अभ्यासक्रमांसाठी अर्हता- पदवी.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनआयसीएमआर कॉमन अॅडमिशन टेस्ट (किंवा CAT, G-MAT, GATE, CMAT या परीक्षांमधील गुणसुद्धा ग्राह्य़ धरले जाऊ शकतात.) गटचर्चा आणि मुलाखत घेतली जाते. यासाठी २५० गुण आहेत. त्यापकी एनआयसीएमआर सामायिक प्रवेश चाचणीला १५० गुण, गटचर्चेला २० आणि मुलाखतीला ३० गुण आहेत. रेटिंग ऑफ अॅप्लिकेशनला ५० गुण आहेत. एनआयसीएमआर कॉमन अॅडमिशन टेस्ट पुणे येथे घेतली जाते.
संस्थेचे पदविका अभ्यासक्रम :
= ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन क्वालिटी सव्र्हेइंग अॅण्ड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही
शाखेतील इंजिनीयिरग.
= ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन हेल्थ सेफ्टी अॅण्ड एन्व्हायरन्मेन्ट मॅनेजमेंट, अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीयिरग किंवा कोणत्याही इंजिनीयिरग शाखेतील पदविका आणि एक वर्षांचा अनुभव. दोन्ही अभ्यासक्रम हैदराबाद येथील कॅम्पसमध्ये शिकवले जातात. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी एक वर्ष.
पत्ता : एनआयसीएमएआर, पुणे, २५/१, बालेवाडी,
पुणे ४११००५. वेबसाइट- http://www.nicmar.ac.in
ईमेल- sode@nicmar.ac.in
* हिंदुस्थान युनिव्हर्सटिी :
= बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीयिरग (कन्स्ट्रक्शन इंजिनीयिरग अॅण्ड मॅनेजमेंट)
= बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीयिरग (एन्व्हायरन्मेन्ट इंजिनीयरिंग अॅण्ड वॉटर रिसोस्रेस)
= बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीयिरग (स्ट्रक्चरल इंजिनीयिरग)
= इंटिग्रेटेड एम.टेक इन कन्स्ट्रक्शन अॅण्ड मॅनेजमेंट
पत्ता- नंबर ४०, जीएसटी रोड, सेंट थॉमस माऊंट, चेन्नई- ६०००१६.
वेबसाइट- http://www.hindustanuniv.ac.in
ई- मेल- info@hindustanuniv.ac.in
बांधकाम क्षेत्राची भरारी
स्थापत्य अभियांत्रिकीला (सिव्हील इंजिनीयरिग) आलेले महत्त्व लक्षात घेता या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील काही वेगळ्या अभ्यासक्रमांची ओळख-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2015 at 08:42 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha 13 may