आपल्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेचा शोध प्रत्येक पालकाला दहावीपर्यंत लागायलाच हवा. प्रत्येक मुलाची अभ्यासातील गती सारखीच असतेच, असं नाही. ही बाब ओळखून पालकांनी आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणं सोडायला हवं. मुलांच्या सुप्त गुणांचा, विशिष्ट विषयातील त्याच्या बुद्धय़ांकाचा विचार पालकांनी करायला हवा. आजच्या काळात मुलांचा बुद्धय़ांक आणि कल यांची चाचणी घेणाऱ्या संस्था अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. अशा संस्थांनी विकसित केलेल्या पद्धती, तंत्र, आकडेमोड आणि विश्लेषणाचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण खरं तर आपल्या मुलांचा कल कशाकडे आहे, या बाबी पालकांनाही ओळखता येतील.
नवे पर्याय
मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून जर मुलांच्या शिक्षणाची दिशा ठरवली गेली तर अनेक समस्या टाळता येऊ शकतात. गेल्या काही वर्षांत करिअरच्या संकल्पना बदललेल्या आहेत. विविध नवी क्षेत्रं विकसित होत असून त्यात कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम संधीसुद्धा मिळू लागली आहे. या बदलत्या प्रवाहांची दखल घेऊन अनेक शैक्षणिक संस्था अभिनव अभ्यासक्रम सुरू करत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, ज्वेलरी आणि फॅशन डिझायिनग, हॉटेल मॅनेजमेंट, फूटवेअर डिझायिनग, अॅनिमेशन, साऊंड रेकॉडिस्ट, टुरिझम मॅनेजमेंट, मरिन इंजिनीअिरग, बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फर्मेटिक्स, योगाभ्यास, नॅनो टेक्नॉलॉजी, विविध प्रकारचे डिझायिनग,वाइन-टी-कॉफी टेिस्टग, लॅपटॉप-टॅब दुरुस्ती, विमान देखभाल-दुरुस्ती तंत्र या क्षेत्रांचा विकास झपाटय़ाने होत असून या क्षेत्रांतील तज्ज्ञांची गरजही वाढली आहे. करिअरच्या या नव्या पर्यायांकडे मराठी मुलांनी वळायला हवे.
व्होकेशनल कोस्रेस
दहावीनंतर व्होकेशनल कोस्रेसला जाणीवपूर्वक जाण्याची मानसिकताही आपल्याकडे तयार झालेली नाही. सहा महिने ते एक-दोन वर्षांचे हे व्यावसायिक अभ्यासक्रम करिअर उत्तम घडवण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकतात. पालकांनी या बदलत्या परिस्थितीचा- महागडे शिक्षण, भोवतालची परिस्थिती, मुलाची बुद्धिमत्ता आणि कल तसेच भविष्यातील अनिश्चितता याबाबत साकल्याने विचार करायला हवा.
तुम्ही कोणत्या संस्थेतून कोणती पदवी प्राप्त केली हे जरी महत्त्वाचं ठरत असलं तरी नोकरी शोधताना विद्यार्थ्यांने संबंधित विषयांमध्ये किती ज्ञान प्राप्त केलं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कितपत झाला आहे, मिळवलेल्या ज्ञानाचं तो उपयोजन कसं करतो, संवादकौशल्य, नेतृत्वकौशल्य आणि सादरीकरण त्याच्यात विकसित झालंय का, या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
कल चाचणी
ज्या पालकांना आपल्या पाल्याची अॅप्टिटय़ूड टेस्ट करायची असेल तर त्यांनी ती जरूर करावी. त्यातून पालकांना त्यांच्या मुलांचा कल व आवड कळू शकते.
कल चाचणी करणाऱ्या संस्था
= व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था- ही राज्य शासनाची संस्था असून दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून या संस्थेत अॅप्टिटय़ूड टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत ही चाचणी सुरू राहते. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी (विज्ञान शाखा) च्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन प्रारंभी नाव नोदवावं लागतं.
ही चाचणी चार दिवसांची असते. यामध्ये पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. त्यात या विद्यार्थ्यांची कौटुंबिक व व्यक्तिगत माहिती जाणून घेतली जाते. ही मुलाखत साधारणत: दोन तास चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत मानसशास्त्रीय कसोटी घेतली जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, जनरल अॅप्टिटय़ूड टेस्ट (अभियोग्यता चाचणी), अॅडजस्टमेंट टेस्ट (समायोजन चाचणी) आणि इंटरेस्ट इन्व्हेन्टरी (आवड किंवा रस शोध चाचणी) घेतली जाते.
जनरल अॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये आणखी ९ उपचाचण्यांचा समावेश असतो. अॅडजस्टमेट टेस्टमध्ये होम अॅडजस्टमेंट, हेल्थ अॅडजस्टमेंट, सोशल अॅडजस्टमेंट, इमोशनल अॅडजस्टमेंट अशा चार उपचाचण्या घेतल्या जातात. इंटरेस्ट इन्व्हेन्टरीमध्ये तांत्रिक, वैद्यकीय, वाणिज्य, कला आणि उपयोजित कला (फाइन आर्ट्स) या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना कितपत आवड आहे, याची चाचणी घेतली जाते.
तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची केस फाइल तयार केली जाते. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचं समुपदेशन केलं जातं.
ही संपूर्ण चाचणी मोफत आहे. पत्ता- व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, ३, महानगरपालिका मार्ग, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई- ४००००१. याशिवाय पुढील विभागीय कार्यालयांमध्येही ही चाचणी घेतली जाते-
= विभागीय व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे- ४११०३०.
= विभागीय व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, देवगिरी कॉलेजजवळ, पदमपुरा, औरंगाबाद- ४३११०१.
= विभागीय व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय, वलगाव रोड,
अमरावती- ४४४६०४.
= विभागीय व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, शासकीय पटवर्धन हायस्कूल, सीताबर्डी, नागपूर- ४४००१२.
= विभागीय व्यवसाय व मार्गदर्शन व निवड संस्था, महसूल आयुक्त कार्यालय परिसर, बंगला क्रमांक-१७, करन्सी रोड, नाशिक- ४२२१०१.
= सेंट झेवियर महाविद्यालय- या संस्थेत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी तीन तासांच्या पाच चाचण्या घेतल्या जातात. बारावीतील विद्यार्थ्यांसाठी तीन तासांची अॅप्टिटय़ूड टेस्ट, एक तासाची व्यक्तिमत्त्व आणि एक तासाची विज्ञान व इतर चाचणी घेतली जाते. पत्ता- ५, महापालिका मार्ग,
मुंबई- ४००००१. वेबसाइट-www.xaviers.edu
ईमेल- webadmin@xaviers.edu.
= दिशा कौन्सेिलग सेंटर, डोमेक्स- तिसरा मजला, कंचन व्हिला, केएसए कम्पाऊंड, भवानी शंकर रोड, शारदाश्रम शाळेजवळ, दादर, मुंबई-४०००२८
ईमेल- dishacenter@gmail.com
वेबसाइट- http://www.dishforu.com.
= एज्युग्रूमर्स- ही संस्था दहावी आणि बारावीनंतरच्या करिअरसंदर्भात कौन्सेिलग करते. पत्ता- ६४, काळबादेवी, रजत अपार्टमेंट, एमपी रोड, मलबार हिल, मुंबई- ४००००६. वेबसाइट- http://www.edugroomers.com
ईमेल- contact@edugroomers.com.
नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एनजीओ मॅनेजमेंट-
हा अभ्यासक्रम अण्णामलाई युनिव्हर्सटिीच्या डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशनने सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- एक वर्ष. पत्ता- डारेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, अण्णामलाई युनिव्हर्सटिी, अण्णामलाई नगर- ६०८००२,
वेबसाइट- http://www.annamalaiuniversity.ac.in,
ईमेल-dde@ annamalaiuniversity.ac.in